Homeचिट चॅटएमजेएससी कॅरम स्पर्धेत...

एमजेएससी कॅरम स्पर्धेत रेहान शेख विजेता

मुंबईच्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब-एमजेएससी व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित माहीम ज्युवेनाईल चषक आंतर शालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेमध्ये वरळी सी फेस म्युनिसिपल स्कूलचा रेहान शेख विजेता ठरला. अचूक फटकेबाज खेळासह गेममधील सर्व बोर्डात राणीवर वर्चस्व राखत रेहान शेखने अंतिम फेरीमध्ये जोरदार मुसंडी मारणाऱ्या पोद्दार अकॅडमी हायस्कूल-मालाडच्या प्रसन्न गोळेचे आव्हान संपुष्टात आणले आणि अजिंक्यपदाच्या माहीम ज्युवेनाईल चषकाला गवसणी घातली.

विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक चषक व स्ट्रायकर पुरस्काराने एमजेएससीचे अध्यक्ष विजय येवलेकर, सेक्रेटरी राजन गुप्ता, उपाध्यक्ष विकास खानोलकर, खजिनदार महेश शेट्ये, कार्यकारी सदस्य प्रसाद कुलकर्णी, माजी क्रिकेटपटू सुरेंद्र बाबरेकर, प्रमुख पंच चंद्रकांत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.

शिवाजी पार्क येथील माहीम ज्युवेनाईल पव्हेलीयनमध्ये उपांत्य सामन्यात रेहान शेखने कस्तुरबा गांधी स्कूलच्या सिध्दांत मोरेला नमविले. दुसरा उपांत्य फेरीचा सामना जनगणमन ज्युनियर कॉलेज-कोपरचा अथर्व म्हात्रे विरुध्द प्रसन्न गोळे अखेरपर्यंत चुरशीचा झाला. शेवटच्या बोर्डाअगोदर ९-७ अशी आघाडी घेणाऱ्या अथर्व म्हात्रेला निर्णायक क्षणी सर्वांगसुंदर खेळ करीत प्रसन्न गोळेने १४-९ असे चकविले. उपांत्यपूर्व उपविजेतेपदाचा पुरस्कार आयएनजी इंग्लिश स्कूल-वसईचा श्रीशान पालवणकर, आयईएस पाटकर विद्यालय-डोंबिवलीचा नील म्हात्रे, नारायण गुरु स्कूल-चेंबूरचा उमैर पठाण, साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूलचा सम्यक पवार यांनी जिंकला. स्पर्धेत मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील शालेय-कॉलेजमधील ३२ खेळाडूंनी भाग घेतला.

Continue reading

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...
Skip to content