Homeहेल्थ इज वेल्थउच्च रक्तदाब आणि...

उच्च रक्तदाब आणि मधुमेह टाळण्यासाठी करा नियमित व्यायाम

उच्च रक्तदाब आणि मधुमेह, या जीवनशैलीशी निगडीत आजारांना ‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखले जाते. हे आजार शरीराला हळूहळू हानी पोहोचवतात. परंतु, योग्य उपचार आणि जीवनशैलीत बदल केला, तर उच्च रक्तदाब आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळेच उच्च रक्तदाब आणि मधुमेहाला दूर ठेवण्यासाठी सर्वांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित योगा आणि व्यायाम करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आज, ‘जागतिक उच्च रक्तदाब दिना’निमित्त केले आहे.

मुंबई महापालिकेद्वारे सातत्याने अधिकाधिक दर्जेदार आरोग्य व वैद्यकीय सेवासुविधा मुंबईकरांना उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबई उपनगरांमध्ये व्यक्तींचे सर्वेक्षण करून उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या रूग्णांना पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून विविध सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सध्याच्या धावपळीच्या व बदलत्या जीवनशैलीशी निगडित असणाऱ्या रक्तदाब व मधुमेह अशा आजारांबाबतही सातत्याने जागृती करण्यात येते.

लठ्ठपणा, आहारातील मिठाचा अतिवापर, धूम्रपान व मद्यपान, ताण-तणाव आणि कोलेस्ट्रॉलच्या अतिउच्च पातळीमुळे उच्च रक्तदाबासारखे आजार जडण्याची शक्यता असते. परंतु, योग्य उपचारपद्धती आणि जीवनशैलीत बदल केले तरे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. रोजच्या आहारातील मिठाचे प्रमाण ५ ग्रॅमपेक्षा कमी ठेवा, पुरेशी झोप व विश्रांती घ्या, आहारात फळे, भाज्या व कमी चरबीयुक्त अन्नाचे सेवन करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रक्तदाबाची नियमित तपासणी करा असे आवाहन पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

सतत डोके दुखणे, थकवा जाणवणे, छातीत दुखणे, धाप लागणे, अनियमित ह्दयाचे ठोके, अस्पष्ट/दुहेरी दृष्टी आणि अस्वस्थ वाटणे, ही उच्च रक्तदाबाबची लक्षणे आहेत. उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची लक्षणे असलेल्या रूग्णांचे वेळीच निदान होऊन या रूग्णांना अधिकाधिक परिणामकारक वैद्यकीय औषधोपचार मिळावेत, यासाठी पालिका सातत्याने विविधस्तरीय प्रयत्न करीत असते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून ४ जानेवारी २०२३पासून पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आठवड्यातील प्रत्येक बुधवारी आरोग्यसेविका आणि आशा सेविकांच्या मदतीने मुंबई उपनगरांसह झोपडपट्ट्यांच्या भागात लोकसंख्या आधारित स्क्रीनिंग सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणात घरोघरी भेट देऊन ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचे स्क्रीनिंग केले जाते. या सर्वेचा सध्या १९वा टप्पा पूर्ण झाला आहे. 

आरोग्यसेविका आणि आशा सेविकांनी २४ प्रभागांमधील झोपडपट्टी भागात केलेल्या सर्वेक्षणात १९व्या टप्प्यापर्यंत २४ प्रभागांमधील तब्बल २ लाख ६१ हजार १८५ घरांना भेटी देऊन ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ४ लाख ४५ हजार ५४९ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. नमुना पद्धतीने ही तपासणी करण्यात आली. तपासणी करण्यात आलेल्या नागरिकांपैकी २९ हजार ६२४ उच्च रक्तदाबाचे संशयित रूग्ण आढळून आले. सर्वेक्षणाच्या १९व्या टप्प्यानंतर मुंबई महापालिका क्षेत्रात ६२ हजार ३९१ नागरिकांना आधीपासूनच उच्च रक्तदाब असल्याचे असल्याचे आढळून आले आहे.

२ ऑगस्ट २०२२ ते ६ मे एप्रिल २०२३ या कालावधीत एकून १५ तपासणी केंद्रात १ लाख  ३७ हजार ७३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यातील १४ हजार ३४२ उच्च रक्तदाबाचे संशयित रूग्ण आढळून आले तर १४ हजार ६८३ मधुमेहाचे संशयित रूग्ण आढळून आले. शिवाय ५ हजार ५८९ रूग्णांना दोन्ही म्हणजे उच्च रक्तदाब आणि मधुमेह संशयित असल्याचे आढळून आले आहे. मार्च २०२३मध्ये ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या २३ हजार ७१४ व्यक्तींनी पालिकेच्या दवाखान्यातून उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची तपासणी करून घेतली आहे. पालिकेच्या आपला दवाखान्यातून ५३ हजार ५५७ रूग्णांनी तपासणी करून घेतली आहे. या तपासणी केंद्रांमध्ये रूग्णांची तपासणी करून त्यांना अधिकाधिक प्रभावी वैद्यकीय औषधोपचार दिले जातात. पालिकेने एकूण १५ रूग्णालयांमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी केंद्र सुरू केली आहेत. येथे रूग्णांची तपासणी व पाठपुरावा करून त्यांना पुढील रूग्णालयात संदर्भित करण्यात येते.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content