Homeचिट चॅटराज ठाकरे करणार...

राज ठाकरे करणार पुराणिक स्मृती महिला क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन!

मुंबईतल्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा ४ ते ७ फेब्रुवारीदरम्यान शिवाजी पार्क मैदानात आयोजित करण्यात आली आहे. सलग तिसऱ्या वर्षी ही स्पर्धा माहीम ज्युवेनाईल व एसपीजी खेळपट्टीवर नामवंत १६ महिला संघांच्या सहभागाने रंगणार आहे. दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन विरुध्द डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स यामधील उद्घाटनीय लढत मंगळवारी सकाळी ८.३० वा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल देऊन सुरु होईल. याप्रसंगी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय नाईक व जनरल सेक्रेटरी अभय हडप तसेच अपेक्स कमिटी सभासद उपस्थित राहणार आहेत.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या स्पर्धेतील प्रतिष्ठेचा प्रकाश पुराणिक स्मृती चषक पटकाविण्यासाठी दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन, राजवाडी क्रिकेट क्लब, फोर्ट यंगस्टर्स, डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स, पय्याडे स्पोर्ट्स क्लब, साईनाथ स्पोर्ट्स क्लब, दहिसर स्पोर्ट्स क्लब, ग्लोरीयस क्रिकेट क्लब, रिगल क्रिकेट क्लब, व्हिक्टरी क्रिकेट क्लब, स्पोर्ट्सफिल्ड क्रिकेट क्लब, भारत क्रिकेट क्लब, माटुंगा जिमखाना, एमआयजी क्रिकेट क्लब, स्पोर्टिंग युनियन क्लब, पालघर-डहाणू स्पोर्ट्स आदी महिला संघांमध्ये चुरस होईल. बाद पध्दतीने होणाऱ्या स्पर्धेची अंतिम फेरी ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १.०० वा. माहीम ज्युवेनाईल खेळपट्टीवर होईल. अंतिम विजेत्या संघास रोख रु. ५०,०००/- व चषक, उपविजेत्यास रु. २५,०००/- व चषक आणि उपांत्य उपविजेत्या दोन्ही संघास प्रत्येकी रु. १५,०००/- पुरस्कार तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूस रु. १०,०००/-, उत्कृष्ट फलंदाज रु. ५,०००/-, उत्कृष्ट गोलंदाज रु. ५,०००/- व उदयोन्मुख खेळाडूस रु. ५,०००/- पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती माहीम जुवेनाईल स्पोर्ट्स क्लबचे खजिनदार महेश शेट्ये यांनी दिली.

Continue reading

हा पाहा महायुती सरकारचा दुटप्पीपणा!

देशातीलच नव्हे तर जगातील शास्त्रज्ञ व वैद्यकीय तज्ज्ञ यांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे कबुतरापासून माणसाच्या फुफ्फुसाला धोका निर्माण होतो, हे सिद्ध झाले आहे. न्यायालयाने योग्य निर्णय देत यावर बंदीही आणली असतानाही, दादरला एक समुदाय कबुतरांना खायला दाणे टाकून न्यायालयाच्या निर्णयाला...

कोमसाप मुंबईच्या अध्यक्षपदी विद्या प्रभू; जगदीश भोवड जिल्हा प्रतिनिधी

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा अध्यक्षपदी विद्या प्रभू यांची निवड झाली आहे. विद्यमान अध्यक्ष मनोज वराडे आणि विद्या प्रभू यांच्यात लढत झाली. त्यात विद्या प्रभू विजयी झाल्या. यावेळी मुंबई जिल्ह्याची कार्यकारिणीही निवडण्यात आली. केंदीय समितीवर जिल्हा प्रतिनिधी म्हणून जगदीश...

महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेसाठी नोंदवा 31 ऑगस्टपर्यंत सहभाग

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 3 नोव्हेंबर, 2025पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांंसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांंसाठी नाट्यसंस्थांकडून येत्या 31 ऑगस्ट, 2025पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती...
Skip to content