नुकत्याच संपन्न झालेल्या मुंबई उपनगरातील सर्वात मोठ्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवात रायशा सावंतने मुलींच्या गटात शानदार कामगिरी करताना लांब उडीत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला.
सध्या रायशा दहिसर (पश्चिम) येथील रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये चौथीत शिकत आहे. याअगोदर मे २०२३मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्समध्ये तिने मुलींच्या ८ वर्षांखालील गटात सुवर्णपदक पटकावले होते. रायशा ४ वर्षांची असल्यापासून प्रशिक्षक विनायक शिर्के यांच्याकडे अॅथलेटिक्सचे धडे घेत आहे. प्रबोधन महोत्सवातील मिळवलेल्या सुवर्ण यशाबद्दल शाळेतर्फे तिचे खास अभिनंदन करण्यात आले आहे. तिच्या यशात तिच्या कुटुंबाचादेखील खूप मोठा वाटा आहे.