Homeडेली पल्सपंतप्रधानांच्या हस्ते आज...

पंतप्रधानांच्या हस्ते आज जागतिक भारतीय अन्न प्रदर्शनाचे उद्घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘जागतिक भारतीय अन्न 2023’ या खाद्यान्नविषयक जागतिक भारतीय अन्न प्रदर्शनाच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन करणार आहेत. हा कार्यक्रम आज, 3 नोव्हेंबर रोजी सकाळी नवी दिल्लीच्या प्रगती मैदानावरील भारत मंडपम येथे होत आहे.

स्वयंसहाय्यता बचत गटांना बळकट करण्याच्या उद्देशाने यावेळी पंतप्रधान बचतगटाच्या एक लाख सदस्यांना बियाणे भांडवल मदत अनुदान वितरित करणार आहेत. या मदत अनुदानामुळे, बचत गटांच्या उत्पादनांना अधिक सुधारित पॅकेजिंग आणि दर्जेदार निर्मिती यांच्या माध्यमातून बाजारपेठेत अधिक चांगली किंमत मिळवण्यात मदत होईल. पंतप्रधान मोदी यावेळी ‘जागतिक भारतीय अन्न 2023’ कार्यक्रमाचा भाग म्हणून आयोजित फूड स्ट्रीटचेदेखील उद्घाटन करतील. या फूड स्ट्रीटवर प्रादेशिक पाककृती आणि राजेशाही पाककलावारसा यांचे दर्शन घडेल. या उपक्रमात 200पेक्षा अधिक शेफ सहभागी होणार असून ते पारंपरिक भारतीय पदार्थ सादर करतील आणि त्यातून हा उपक्रम एक वैशिष्ट्यपूर्ण पाककलाविषयक अनुभव देईल.

अन्न

भारताला ‘जगाचे फूड बास्केट’ या स्वरुपात सादर करणे तसेच 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’ म्हणून साजरे करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमामुळे सरकारी संस्था, उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक, शेतकरी, आन्त्रप्रोनर्स आणि इतर भागधारकांना चर्चेत सहभागी होऊन भागीदारी संबंध प्रस्थापित करणे तसेच कृषी खाद्यान्न क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधींचा शोध घेणे यासाठीचा नेटवर्किंग आणि व्यापारविषयक मंच उपलब्ध होणार आहे. यावेळी गुंतवणूक तसेच व्यापार करण्यातील सुलभता या विषयांवर अधिक लक्ष केंद्रित करणारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गोलमेज परिषददेखील होणार आहे.

भारतीय अन्नप्रक्रिया उद्योगांतील नवोन्मेष तसेच सामर्थ्य यांचे दर्शन घडवणारी विविध दालने येथे उभारण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात अन्नप्रक्रिया उद्योगाच्या विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करणारी आणि आर्थिक सक्षमीकरण, गुणवत्तेची हमी आणि यंत्रे तसेच तंत्रज्ञान यांतील नवोन्मेष यांच्यावर अधिक भर देणारी 48 सत्रे होणार आहेत.

जगातील आघाडीच्या अन्नप्रक्रिया उद्योगांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह 80हून अधिक देशांतील व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी जगभरातील 80हून अधिक देशांतून आलेल्या 1200 खरेदीदारांचा सहभाग असलेली रिव्हर्स बायर सेलर मीट ही बैठकदेखील होणार आहे. या कार्यक्रमासाठी नेदरलँड्स हा भागीदार देश म्हणून कार्य करेल तर जपान हा कार्यक्रमाचा भर असलेला देश असेल.

Continue reading

57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला पहिल्यांदा भेट देणार भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात तब्बल 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला तसेच गेल्या 60 वर्षांत ब्राझिलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील. 2 ते 9 जुलै 2025 असा पंतप्रधानांचा हा दौरा आहे. या कालावधीत ते घाना,...

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...

रविवारी आस्वाद घ्या आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ आरती ठाकूर – कुंडलकर यांचे गायन येत्या रविवारी, ६ जुलैला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी त्यांना संजय देशपांडे तबला...
Skip to content