Homeन्यूज ॲट अ ग्लांसबुलेट ट्रेनच्या सूरतमधल्या...

बुलेट ट्रेनच्या सूरतमधल्या कामाचा आज पंतप्रधान मोदी घेणार आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शनिवारी गुजरातच्या सूरतमधल्या बांधकामाधीन बुलेट ट्रेन स्थानकाला भेट देणार असून मुंबई–अहमदाबाद उच्चगती रेल्वे मार्गिकेच्या (बुलेट ट्रेन) प्रगतीचा आढावा घेणार आहेत. या ​​​​​​​बुलेट ट्रेनमुळे मुंबई–अहमदाबाद प्रवासाचा कालावधी सुमारे दोन तासांवर येणार आहे.

पंतप्रधान मोदी आज गुजरातला भेट देणार आहेत. सकाळी 10 वाजता ते सूरतमधल्या बांधकामाधीन बुलेट ट्रेन स्थानकाला भेट देऊन मुंबई–अहमदाबाद उच्चगती रेल्वे मार्गिका, या देशातल्या सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतील. हा प्रकल्प भारताच्या उच्च-गती रेल्वे युगातल्या पदार्पणाचे प्रतीक मानला जातो. मुंबई–अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर जवळजवळ 508 किलोमीटर लांबीचा असून त्यापैकी 352 किलोमीटरचा भाग गुजरात आणि केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगरहवेलीमधून जातो. 156  किलोमीटरचा भाग महाराष्ट्रात येतो. हा कॉरिडॉर साबरमती, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भरूच, सूरत, बिलीमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई अशी महत्त्वाची शहरे जोडणार आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पातला 465 किलोमीटरचा मार्ग (सुमारे 85 टक्के) उड्डाणपुलांवर असणार आहे. त्यामुळे जमिनीचा कमी वापर आणि अधिक सुरक्षितता सुनिश्चित होते. आतापर्यंत 326 किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलांचे काम पूर्ण झाले असून 25पैकी 17 नदीवरील पूल बांधले गेले आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई आणि अहमदाबादमधील प्रवासाचा कालावधी दोन तासांवर येईल. यातून अनेक शहरांमधला प्रवास अधिक वेगवान, सुलभ आणि आरामदायी ठरेल. या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे व्यवसाय, पर्यटन आणि आर्थिक उलाढालीला चालना मिळेल तसेच संपूर्ण कॉरिडॉर परिसराचा विकास होईल.

सूरत–बिलीमोरा विभाग सुमारे 47 किलोमीटर लांबीचा असून हा विभाग कामाच्या अंतिम टप्प्यात आहे. येथील नागरी बांधकाम आणि ट्रॅक-बेड घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. सूरत स्थानकाचे डिझाइन शहराच्या जगप्रसिद्ध हिरे उद्योगापासून प्रेरित आहे. यामध्ये सौंदर्य आणि कार्यक्षमतेचा संगम दिसून येतो. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशस्त प्रतीक्षालये, स्वच्छतागृहे आणि किरकोळ विक्री केंद्रे, आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या स्थानकाला सूरत मेट्रो, शहर बससेवा आणि रेल्वे नेटवर्कची सुसंगत जोडणी दिली जाणार आहे.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content