Homeहेल्थ इज वेल्थपंतप्रधान मोदींनी केले...

पंतप्रधान मोदींनी केले राज्यातल्या विविध आरोग्य सुविधांचे भूमीपूजन

सर्वसामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पुरविण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे राज्यातील आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यात आले असून, या २२३ कोटी रुपये खर्चाच्या आरोग्य सुविधांमुळे जनतेला दर्जेदार आणि गतिमान आरोग्य सेवा मिळणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट येथून दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्यातील विविध आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई येथे यानिमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  “प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्प इन्फ्रास्ट्रक्चर मिशन” (पीएम-अभिम ) अंतर्गत  खालील आरोग्य संस्थांचे भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या.

पीएम-अभिम अंतर्गत १३५.०५ कोटी रुपये खर्चाच्या  क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉक कामाचे भूमिपूजन झाले.

यामध्ये जिल्हा रुग्णालय, जि. पुणे – १०० खाटा,

जिल्हा रुग्णालय, जि. अहमदनगर ५० खाटा,

जिल्हा रुग्णालय, जि. बुलढाणा – ५० खाटा,

जिल्हा रुग्णालय, जि. बीड – ५० खाटा,

आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, जि. नंदुरबार – ५० खाटा समावेश आहे.

तसेच पीएम-अभिम अंतर्गत. १.२५ कोटी रुपये खर्चाच्या इंटिग्रेटेड पब्लिक हेल्थ लॅब जिल्हा रुग्णालय, जि. अमरावती भूमिपूजन झाले.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एकूण  ७७.९४ कोटी रुपये खर्चाच्या खालील आरोग्य सुविधांचे लोकार्पण झाले.

– मुख्य इमारत आणि १४ स्टाफ क्वार्टर – प्रा. आ. केंद्र, करजगाव ता. चांदूरबाजार जि. अमरावती

– मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर ग्रामीण रुग्णालय, जैताने ता. साक्री जि. धुळे

– मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर प्रा. आ. केंद्र, शिराळा ता. अमरावती जि. अमरावती

– जिल्हा वेअरहाऊस, मिटींग, डीपीएमए ऑफिस, जि. चंद्रपूर

– स्टाफ क्वार्टर – प्रा.आ.केंद्र, ताडली ता. चंद्रपूर जि. चंद्रपूर

– मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर प्रा.आ. केंद्र, गव्हाळी, ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार

– मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर ग्रामीण रुग्णालय, सावदा ता. रावेर जि. जळगाव

– मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर ग्रामीण रुग्णालय, किनगाव ता. यावल जि. जळगाव

राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत एकूण  8.99 कोटी रुपये खर्चाच्या पुणे येथील नवीन आयुष रुग्णालय इमारतीचे लोकार्पण झाले.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content