राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून म्हणजेच 19 तारखेपासून 23 फेब्रुवारीपर्यंत अंदमान आणि निकोबार बेटांना भेट देणार आहेत. आज 19 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती हुतात्मा स्तंभावर पुष्पहार अर्पण करतील आणि सेल्युलर जेल कॉम्प्लेक्स आणि संग्रहालयाला भेट देतील. सेल्युलर जेलमधील लाईट अँड साउंड शोसाठीही त्या उपस्थित असतील. नंतर राष्ट्रपती पोर्ट ब्लेअर येथील डॉ. बी. आर. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला भेट देतील आणि त्यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात येणाऱ्या नागरी सत्काराला उपस्थित राहतील.
उद्या 20 फेब्रुवारीला राष्ट्रपती इंदिरा पॉईंट आणि कॅम्पबेल बेला भेट देतील. त्यानंतर त्या सुभाषचंद्र बोस बेटाला भेट देतील आणि लाईट अँड साउंड कार्यक्रमालाही त्या उपस्थिती लावतील.
21 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती पोर्ट ब्लेअरच्या राज निवास येथे अंदमान आणि निकोबार बेटांच्या पीव्हीटीजीच्या सदस्यांशी संवाद साधतील. त्याच दिवशी, राधानगर किनाऱ्यावर सैन्याने केलेल्या संचलन प्रात्यक्षिकाच्याही त्या साक्षीदार असतील.