Homeपब्लिक फिगरराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून मेघालय, आसामच्या दौऱ्यावर!

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज 15 जानेवारीपासून 17 जानेवारी 2024, या कालावधीत मेघालय आणि आसामला भेट देणार आहेत. आज राष्ट्रपती तुरा येथील पीए संगमा मैदानावर, मेघालय राज्य क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करतील.

उद्या, 16 जानेवारी रोजी, राष्ट्रपती तुरा येथील बाल्जेक विमानतळ इथे बचतगटांच्या सदस्यांना संबोधित करतील आणि दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून तुरा येथील नवीन एकात्मिक प्रशासन संकुलाची  पायाभरणी करतील. त्याच दिवशी, राष्ट्रपती मावफ्लांग येथे एका मेळाव्याला संबोधित करतील आणि दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नव्याने सुधारणा करण्यात आलेल्या रोंगजेंग मंगसांग एडोकग्रे रस्त्याचे आणि मैरांग रानीगोडाउन आजरा रस्त्याचे उद्घाटन करतील. तसेच शिलाँग शिखरावर जाण्यासाठीच्या रोपवेची आणि कोंगथॉन्ग, मावलिनगोट आणि कुदेनग्रीम या गावांमध्ये पर्यटकांच्या निवासस्थानांची पायाभरणी करतील. संध्याकाळी, राष्ट्रपती शिलॉंग येथील राजभवनात मेघालय सरकारतर्फे त्यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात येणाऱ्या नागरी सत्कार सोहळ्याला उपस्थित राहतील.

17 जानेवारी रोजी, आसाममधील तारांगसो, दिफू येथे कार्बी युवा महोत्सवाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला राष्ट्रपती उपस्थित राहतील.

Continue reading

नाशिकमध्ये झाला ग्लॅमर आणि सांस्कृतिक वारशाचा मिलाफ!

महाराष्ट्राच्या सुवर्ण परंपरेचा वारसा जपणाऱ्या पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स (पीएनजीजेएल)ने आपल्या विस्ताराचा अश्वमेध सुरूच ठेवला असून, मुंबईसह आता नाशिकमध्ये आपले नवीन भव्य दालन सुरू केले आहे. नाशिकच्या वाढत्या बाजारपेठेची गरज आणि ग्राहकांचा वाढता ओढा लक्षात घेऊन कंपनीने हे पाऊल...

तीन-चार महिन्यांनंतर वाढणार साखरेची ‘गोडी’!

जागतिक बाजारात सध्या साखरेच्या दराबाबत मोठी खळबळ उडाली आहे. 2026च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत (एप्रिल ते सप्टेंबर) साखरेचे भाव तेजीत राहतील, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. याला केवळ मागणी कारणीभूत नसून, त्यामागे पॅसिफिक महासागरातील हवामान बदल, ऊर्जेची भूक आणि...

सुटीच्या रविवारी दिवशी २०७ शासननिर्णयांची आतषबाजी!

काल रविवार, २९ मार्चचा सुटीचा दिवस असला तरी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालयातील संगणक टायपिंग मात्र थांबले नाही. आर्थिक वर्षाचा शेवट (३१ मार्च) जवळ येत असताना, महायुती सरकारने रविवारी (२९ मार्च २०२६) एकाच दिवसात तब्बल २०७ शासननिर्णय (जीआर) निर्गमित करून प्रशासकीय...
Skip to content