Homeहेल्थ इज वेल्थसुश्रुत जयंतीनिमित्त गुंतागुंतीच्या...

सुश्रुत जयंतीनिमित्त गुंतागुंतीच्या 25 शल्यक्रियांचे सादरीकरण

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या (एआयआयए) शल्यतंत्र विभागाने सुश्रुत जयंतीच्या निमित्ताने नवी दिल्लीत सौश्रुतम् शल्य संगोष्टी, नावाच्या दुसऱ्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले. शल्यक्रिया तंत्राचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुश्रुत यांच्या शल्यक्रिया कौशल्याचा बहुमान करण्यासाठी दरवर्षी 15 जुलैला सुश्रुत जयंती साजरी केली जाते. 13 जुलैला सुरू झालेल्या या चर्चासत्रात गुंतागुंतीच्या 25 शल्यक्रियांचे यशस्वी सादरीकरण करण्यात आले.

एम्स भोपाळचे संस्थापक संचालक प्रो. संदीप कुमार या चर्चासत्राच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पहिल्या दोन दिवसात गुंतागुंतीच्या 25 शल्यक्रियांचे यशस्वी सादरीकरण करण्यात आले. नामवंत शल्यविशारदांच्या कौशल्याचे निरीक्षण करण्याची आणि त्याचे अध्ययन करण्याची आगळीवेगळी संधी यानिमित्ताने अनेकांना उपलब्ध झाली. गेल्या एका वर्षात एआयआयएच्या शल्यक्रियांमुळे 1500 रुग्णांना लाभ मिळाला आहे.

एआयआयएच्या संचालक प्रो. तनुजा नेसारी म्हणाल्या की, या विभागाच्या प्रारंभापासूनच आयुर्वेदाला जागतिक स्तरावर उंचावण्यासाठी एआयआयए वचनबद्ध आहे. शल्यतंत्र विभागाने आयोजित केलेल्या सौश्रुतममधून आयुर्वेदाला अत्याधुनिक शल्यक्रिया तंत्रज्ञानासोबत जोडण्याची आमची वचनबद्धता दिसून येत आहे आणि होतकरू आयुर्वेद शल्यविशारदांचे आधुनिक कौशल्यांद्वारे सक्षमीकरण होत आहे. एकात्मिक शल्यक्रिया सरावांमुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होत आहे.

या राष्ट्रीय चर्चासत्राच्या तिसऱ्या दिवशी सुश्रुत पूजन समारंभ आयोजित करण्यात आला. त्यानंतर एका प्रबंध सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 160पेक्षा जास्त सहभागींनी स्वतःची नोंदणी केली, ज्यामध्ये देशाच्या विविध भागातील पदव्युत्तर / पीएच. डी. विद्वान, निवासी डॉक्टर, शल्यविशारद आणि अध्यापक वर्गातील सहभागींचा समावेश होता.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content