Homeमुंबई स्पेशल17 मार्चला मुंबईत...

17 मार्चला मुंबईत टपाल पेन्शन अदालत

मुंबईच्या मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र परिमंडळ यांनी टपाल विभागातल्या निवृत्तीवेतनधारक आणि कुटूंब वेतनधारकांसाठी येत्या 17 मार्चला सकाळी साडेअकरा वाजता टपाल पेन्शन अदालतीचे आयोजन केले आहे. मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र परिमंडळ यांच्या कार्यालयात ही पेन्शन अदालत घेतली जाईल. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये टपाल विभागाच्या सेवेत असताना निवृत्त झालेले निवृत्तीवेतनधारक किंवा निधन झालेल्या व्यक्तींच्या कुटूंब वेतनधारकांच्या निवृत्तीवेतनविषयक लाभांशी संबंधित तक्रारींचे निवारण यावेळी केले जाईल. मात्र अशा तक्रारी तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून प्रलंबित असाव्यात. मात्र वारसाहक्काचे प्रश्न, वेतनवाढ, धोरणात्मक बाबींशी संबंधित शिस्तभंगाची प्रकरणे आणि विभागीय पदोन्नती समितीच्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित असलेली प्रकरणे यासारख्या पूर्णपणे कायदेशीर बाबींशी संबंधित प्रकरणांचा पेन्शन अदालतीत विचार केला जाणार नाही.

निवृत्तीवेतनधारक/कुटूंब वेतनधारकांनी आपल्या तक्रारी वैयक्तिकरित्या (सामूहिकपणे किंवा इतरांच्या वतीने नाही) विहित नमुन्यात, तीन प्रतींमध्ये, खालील पत्त्यावर सादर कराव्यात. 

वरिष्ठ लेखा अधिकारी / सचिव,

पेन्शन अदालत,

मुख्य पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय,

महाराष्ट्र परिमंडळ,

मुंबई जीपीओ इमारत, पहिला मजला,

मुंबई – 400001

याखेरीज अर्ज ईमेलद्वारे देखील पाठवले जाऊ शकतात-   accts.mh@indiapost.gov.in.

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 16 फेब्रुवारी  2026 आहे.  निर्धारित मुदतीनंतर मिळालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. तक्रारी सादर करण्यासाठीच्या विहित अर्जामध्ये निवृत्तीवेतनधारक/कुटूंब वेतनधारकाचे नाव, सेवानिवृत्ती/मृत्यूच्या वेळी असलेले पदनाम, पीपीओ क्रमांक, ज्या टपाल कार्यालयातून निवृत्तीवेतन काढले  जाते त्या कार्यालयाचे नाव, संपर्क क्रमांकासह टपाल पत्ता, तक्रारीचे संक्षिप्त वर्णन, दिनांक व अर्जदाराची स्वाक्षरी यासारख्या तपशिलांचा समावेश आहे.

पेन्शन अदालतीसाठी करावयाच्या अर्जाचा नमुना पुढीलप्रमाणे-

DEPARTMENT OF POSTS

APPLICATION FORM OF POSTAL PENSION ADALAT

   S. No.  SUBJECT      Details  to be filled in by the individual/pensioner     
1Name of the pensioner/family pensioner with designation at the time of retirement/death 
2Name of post office from where retired etc and date of retirement 
3PPO. no. 
4Name of the post office from where pension being withdrawn 
5Post address of the pensioner with Phone No. 
6Complaint in brief (Attach application containing details, if required) 
7Date & Signature of the individual/pensioner

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content