Friday, March 14, 2025
Homeचिट चॅटपोलो राजा-महाराजांचा खेळ...

पोलो राजा-महाराजांचा खेळ राहता कामा नये..

पोलो खेळाची सुरुवात भारतात झाली असे मानतात. आज हा खेळ जागतिक झाला आहे. साहस, धैर्य, गती व कौशल्य यांचा या खेळात मिलाफ आहे. परंतु ऐतिहासिक कारणांमुळे हा खेळ राजा-महाराजांचा आहे, असे म्हणून पहिले जाते. ही धारणा बदलून हा खेळ जनसामान्यांचा झाला पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी काल मुंबईत केले.

???????????????????????????????

आदित्य बिर्ला समूहातर्फे आयोजित आदित्य बिर्ला स्मृती पोलो कप अंतिम स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी राज्यपाल बैस यांच्या हस्ते महालक्ष्मी रेस कोर्स येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यपालांच्या हस्ते डायनॅमिक्स अचिव्हर्स या विजेत्या संघाला आदित्य बिर्ला स्मृती पोलो कप देण्यात आला. विजेत्या संघाने मुंबई पोलो संघाला हरवत ७-६ अंकांनी सामना जिंकला. पोलो व हॉर्स रेसिंग हे खेळ महाराष्ट्राला आंतर राष्ट्रीय नकाशावर आणू शकतात. या खेळाच्या माध्यमातून रोजगाराच्यादेखील अनेक संधी निर्माण होऊ शकतात. उद्योगपती दिवंगत आदित्य बिर्ला यांच्या स्मृती प्रित्यर्थ पोलो कप सुरू केल्याबद्दल समूहाचे अभिनंदन करताना आगामी काळात ‘आदित्य बिर्ला स्मृती पोलो कप’ ही स्पर्धा भारतातील सर्वाधिक प्रतिष्ठेची स्पर्धा होईल, असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला. सुरुवातीला राज्यपालांच्या उपस्थितीत या स्पर्धेतील अंतिम सामना डायनॅमिक्स अचिव्हर्स व मुंबई पोलो या संघांमध्ये खेळण्यात आला. सामन्याचे उदघाटन राज्यपालांच्या हस्ते मैदानात चेंडू फेकून करण्यात आले. डायनॅमिक्स अचिव्हर्स संघाने ७-६ अंकांनी हा सामना जिंकला.

???????????????????????????????

सामन्यानंतर राज्यपालांच्या हस्ते दोन्ही संघांमधील खेळाडूंचा तसेच पंचांचा सत्कार करण्यात आला. 
यावेळी आदित्य बिर्ला समूहाच्या संचालिका राजश्री बिर्ला, समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला, समूहाच्या व्यवसाय आढावा परिषदेचे अध्यक्ष ए के अगरवाला, अमेच्युअर रायडर्स क्लबचे अध्यक्ष श्याम मेहता, उपाध्यक्ष नासिर जमाल, माजी अध्यक्ष सुरेश तापुरीया आदी उपस्थित होते.         

???????????????????????????????

Continue reading

‘शातिर..’मधून अभिनेत्री रेश्मा वायकर करणार पदार्पण

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या महिलाप्रधान चित्रपटाला चांगले दिवस आल्याचे दिसते. मात्र मराठीत महिलाप्रधान सस्पेन्स थ्रिलर प्रकारातील चित्रपटांचा अभाव आहे. आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रीयांस आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या वतीने ‘शातिर THE BEGINNING’ या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या...

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...
Skip to content