Homeकल्चर +काही ग्रहांमधील योगाच्या...

काही ग्रहांमधील योगाच्या स्थित्यंतराने येते नैसर्गिक आपत्ती!

प्राचीन भारतीय ऋषिमुनींनी नक्षत्रांचे गुणधर्म ओळखून सत्त्वगुणी नक्षत्रांना देवगणी, राजसिक नक्षत्रांना मनुष्यगणी आणि तमोगुणी नक्षत्रांना राक्षसगणी अशा संज्ञा दिल्या आहेत. राक्षसगणी नक्षत्रे ही व्यक्तीगत सौख्याच्या दृष्टीने साधारणपणे प्रतिकूल ठरतात. परंतु कर्तृत्त्व, अधिकार, प्रतिष्ठा आणि भौतिक उत्कर्ष यादृष्टीने अनुकूल ठरतात. मेदिनीय (राष्ट्रीय) ज्योतिषात राक्षसगणी नक्षत्रांची (कृत्तिका, धनिष्ठा, मूळ इत्यादी तमोगुणी नक्षत्रांची) भूमिका महत्त्वाची ठरते. गुरू, शनि, हर्षल आदी मोठ्या ग्रहांमधील योग जेव्हा राक्षसगणी नक्षत्रांमध्ये होतात, तेव्हा राष्ट्रीय स्तरावर नैसर्गिक आपत्ती, राजकीय स्थित्यंतरे, युद्ध अशा घटना घडतात, असे प्रतिपादन ज्योतिष विशारद राज कर्वे यांनी नुकतेच केले.

ते ऑनलाईन ‘ज्योतिष कट्टा व्याख्यानमाले’त ‘राक्षसगणी नक्षत्रांची वैशिष्ट्ये’ या विषयावर बोलत होते. ‘फल ज्योतिष अभ्यास मंडळ, पुणे’ यांनी या व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. गेल्या ५०-६० वर्षांत भारतात घडलेल्या ठळक घटनांचा ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोनातून वेध घेताना आम्हाला लक्षात आले, असेही महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे ज्योतिष विशारद राज कर्वे यांनी सांगितले.

ज्योतिषशास्त्राच्या संवर्धनासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने परात्पर गुरू  डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार ज्योतिषशास्त्रात संशोधन कार्य चालू आहे. जानेवारी २०२०पर्यंत महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने देशभरात १४हून अधिक ज्योतिष अधिवेशनांमध्ये ज्योतिषशास्त्रावरील निबंध सादर करण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.

अनेक संतांनी सांगितल्यानुसार येणार्‍या काही वर्षांत भारतासह जगभरात भीषण आपत्काळ येणार आहे. त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती, युद्ध इत्यादींच्या माध्यमातून मोठा जनसंहार होण्याची शक्यता आहे. या आपत्काळातून तरून जाण्यासाठी साधना करणे हाच एकमेव उपाय आहे. कलियुगात नामजप ही सर्वोत्तम साधना आहे, असे अनेक संतांनी सांगितले आहे, असेही कर्वे म्हणाले.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content