Homeएनसर्कलफिजिक्सवालाने ५१ हजार...

फिजिक्सवालाने ५१ हजार विद्यार्थ्यांची केली १७ कोटींची फी माफ

फिजिक्सवाला (पीडब्ल्यू)चे संस्थापक आणि सीईओ अलख पांडे यांनी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दर्जेदार शिक्षण उपलब्ध नसलेल्या गटांच्या मदत आणि सक्षमीकरणासाठी २०२३-२०२४च्या शैक्षणिक सत्रामध्ये ५१,००० विद्यार्थ्यांना आपल्या काही सशुल्क बॅचेससाठीची फी माफ केली आहे. या फी माफीच्या रूपाने दिल्या गेलेल्या योगदानाचे एकूण मूल्य १७ कोटी रूपयांहून अधिक आहे.

वर्ष २०२०मधील आपल्या स्थापनेपासून फिजिक्सवाला उच्च दर्जाचे आणि परवड्याजोगे अभ्यासक्रम पुरविण्याचे, देशाच्या अगदी दुर्गम भागांतील विद्यार्थ्यासाठीही व्यापक पातळीवर शिक्षणाचे लोकशाहीकरण करण्याचे काम समर्पित भावनेने करत आहे. आपल्या परडण्याजोग्या मूल्यरचनेच्या माध्यमातून उच्च दर्जाचा कन्टेन्ट असलेल्या बॅचेस रु. ३,००० आणि अतिरिक्त वैशिष्ट्ये असलेल्या बॅचेस रु. ४,००० किंमतीला उपलब्ध करून देत पीडब्ल्यूने बाजारपेठेमध्ये खळबळ निर्माण केली. या प्रयत्नांनंतरही विद्यार्थ्यांचा एका मोठ्या समूहाला हे अभ्यासक्रमही परवडत नसल्याचे दिसून आल्याने पीडब्ल्यूचे संस्थापक अलख पांडे यांना संधींच्या बाबतीत विद्यार्थ्यांना एक समन्यायी मंच मिळवून देणाऱ्या या उपक्रमाची घोषणा करण्याची कल्पना सुचली.

पीडब्ल्यूचे संस्थापक आणि सीईओ अलख पांडे म्हणाले की, हा उपक्रम प्रतिकूल पार्श्वभूमी लाभलेल्या आणि तरीही आपल्या शैक्षणिक महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याची आस बाळगून असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यांना प्रोत्साहन देणे, आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि आर्थिक मर्यादांमुळे त्यांचा शिक्षणाचा हक्क डावलला जाणार नाही हा विश्वास त्यांना देणे हे आमचे लक्ष्य आहे. संपूर्ण भारतभरात ही क्रांतीकारी चळवळ पोहोचवण्याप्रती आमची बांधिलकी यापुढेही अढळ राहील.

ही फी माफी ड्रॉपर्स आणि इयत्ता १२वीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या नीट अल्टिमेट क्रॅश कोर्स २.०, जेईई अल्टिमेट क्रॅश कोर्स २.०, अर्जुन जेईई आणि नीट ४.०, इयत्ता १२वी सायन्ससाठीचा बोर्ड बूस्टर, इयत्ता १०वीसाठीचे बोर्ड बूस्टर, नीट हिंदी क्रॅश कोर्स, इयत्ता ९वीसाठीचा नीव फास्ट ट्रॅक, इयत्ता ८वीसाठीच्या उमंग २.० आणि इयत्ता ११वी आणि १२वीसाठी कॉमर्स एक्झाम बूस्टर या अभ्यासक्रमांसाठी तसेच इयत्ता ११वी आणि १२वीच्या आर्टस् अभ्यासक्रमांसाठी देण्यात आली.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content