Homeचिट चॅटमंगळवारी होणार अर्थसंकल्पाचे...

मंगळवारी होणार अर्थसंकल्पाचे उद्बोधक विश्लेषण!

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर दरसालप्रमाणे यंदाही, येत्या मंगळवार, दि. २ फेब्रुवारी २०२१ रोजी  सायंकाळी ६-३० वाजता रमा प्रकाशनाने यूट्यूबवर येत्या मंगळवार, दि. २ फेब्रुवारी २०२१ रोजी  सायंकाळी ६-३० वाजता रमा प्रकाशनाने यूट्यूबवर ‘केंद्रीय अर्थसंकल्प (२०२१ ) विश्लेषण’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

उद्या म्हणजेच दि. १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२१-२२चा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करणार आहेत. कोरोना महासाथीच्या अभूतपूर्व संकटाने भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा  आघात केला आहे. ती सावरण्यासाठी, पूर्वी कधीही सादर झाला नव्हता असा वैशिष्ट्यपूर्ण अर्थसंकल्प आपण मांडणार असल्याचे सीतारामन यांनीच जाहीर केल्याने या अर्थसंकल्पाबाबत प्रचंड कुतूहल आणि उत्सुकता निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. अभिजित फडणीस, उदय तारदाळकर आणि श्रीकांत कुवळेकर यांनी केलेले अर्थसंकल्पाचे विश्लेषण निश्चितच  उद्बोधक ठरेल. जास्तीतजास्त जणांनी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन रमा प्रकाशनाचे संचालक, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी यांनी केले आहे.

यूट्यूब लिंक: https://www.youtube.com/watch?v=xjkfZkJOAhQ

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content