Homeब्लॅक अँड व्हाईटएनसीसी प्रजासत्ताकदिन शिबिरात...

एनसीसी प्रजासत्ताकदिन शिबिरात 907 मुलींचा सहभाग!

राष्ट्रीय छात्र सेनेचे (NCC) प्रजासत्ताकदिन शिबिर 2024 दिल्ली कॅन्टॉन्मेंटमधील करिअप्पा परेड ग्राऊंडवर 30 डिसेंबर 2023पासून सर्व धर्म पूजेने सुरू झाले. यावर्षी 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमधून एकूण 2274 छात्र, महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात सहभागी होणार आहेत. या वर्षीच्या शिबिरात 907 मुली सहभागी होणार असून ही आतापर्यंतची मुलींची सर्वोच्च संख्या आहे. ईशान्य प्रदेशातील 171 छात्रांव्यतिरिक्त जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमधील 122 छात्रांचा या विविधतापूर्ण शिबिरात सहभाग असून त्यातून अतिशय प्रभावी पद्धतीने एका लघु भारताचे सूक्ष्म दर्शन घडत आहे.

यूथ एक्स्चेंज कार्यक्रमाचा भाग म्हणून या शिबिरात अर्जेंटिना, बोट्सवाना, भूतान, ब्राझिल, चेक प्रजासत्ताक, फिजी, कझाकस्तान, केनिया, किर्गिझस्तान, लाओस, मलेशिया, मालदीव्ज, नेपाळ, रशिया, सौदी अरेबिया, सेशेल्स, ताजिकिस्तान, यूके, व्हेनेझुएला, व्हिएतनाम, श्रीलंका, सिंगापूर, नायजेरिया, मॉरिशस आणि मोझांबिक या 25 मित्र देशांचे छात्र देखील सहभागी होणार आहेत.

अतिशय मनापासून या शिबिरात सहभागी व्हा आणि शिबिरातील प्रत्येक उपक्रमातून जास्तीत जास्त लाभ मिळवण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन, एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी या छात्रांना संबोधित करताना केले. राष्ट्र सर्वप्रथम या भावनेने धर्म, भाषा, जात यांच्या सीमांच्या पलीकडे जात चारित्र्य, एकात्मता, निःस्वार्थ सेवा, मित्रत्व आणि सांघिक कार्य अशा सर्वोत्तम गुणांचे दर्शन घडवण्याचा सल्ला त्यांनी दिला.

छात्रांमध्ये देशभक्ती, शिस्त आणि नेतृत्वगुणांची भावना निर्माण करणे हा प्रजासत्ताक दिन शिबिराचा मूलभूत उद्देश आहे. या वार्षिक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना उत्तम प्रशिक्षण, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभाग आणि सामाजिक सेवा उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी बहुमूल्य संधी प्रदान करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होते, ज्यामुळे एकता आणि अभिमानाची जोपासना होते.

Continue reading

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ सर्वोत्कृष्ट!

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या 'दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५'चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पी. एन. जी. ज्वेलर्स प्रस्तुत या स्पर्धेत राज्यभरातील १२१ एकांकिकांमधून निवडलेल्या अंतिम फेरीतल्या १६ सर्वोत्कृष्ट कलाकृतींनी दमदार सादरीकरण केले. या वर्षी चुरशीच्या लढतीत...

अध्यात्मशास्त्र दीपावलीचे!

अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी! दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. चौदा...
Skip to content