Homeहेल्थ इज वेल्थकोविडसाठीही उपयुक्त ऑक्सिजन...

कोविडसाठीही उपयुक्त ऑक्सिजन प्रणाली विकसित!

डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने, अति उंच भागात तैनात असलेल्या सैनिकांसाठी, एसपीओ2 (ब्लड ऑक्सिजन सॅच्युरेशन)आधारित पूरक ऑक्सिजन पुरवणारी प्रणाली विकसित केली आहे. कोविडच्या महामारीत ती कोविड रूग्णांसाठीही ही उपयुक्त ठरू शकेल.

डीआरडीओच्या, बेंगलुरू इथल्या संरक्षण बायो–इंजिनीअरिंग आणि इलेक्ट्रो वैद्यकीय प्रयोगशाळेने ही प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली एसपीओ2 पातळीवर आधारित पूरक ऑक्सिजन पुरवते. यामुळे एखादी व्यक्ती हायपोक्सिया म्हणजेच पेशींना पुरेसा ऑक्सिजन न मिळणे, या अनेकदा प्राणघातक ठरणाऱ्या स्थितीत जाण्यापासून वाचू शकते. सध्याच्या कोविड-19 काळात ही प्रणाली म्हणजे एक वरदान ठरणार आहे.

शरीराची उर्जेची आवश्यक गरज भागवण्यासाठी पेशींमध्ये पोहोचणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण अपुरे असणे म्हणजे हायपोक्सिया स्थिती. कोरोना विषाणू संसर्गामुळे कोविड रुग्णामध्ये अशी परिस्थिती उद्भवते आणि सध्याच्या संकटातली ही एक महत्वाची स्थिती/लक्षण आहे.

या प्रणालीमधली इलेक्ट्रोनिक हार्डवेअर प्रणाली हवेचा दाब, तापमान आणि आर्द्रता कमी असणाऱ्या अतिशय उंच भागासाठी तयार करण्यात आली आहे. मनगटावरच्या पल्स ऑक्सीमीटर मोड्यूलमधून वायरलेस इंटरफेसद्वारे ही यंत्रणा व्यक्तीची एसपीओ2 पातळी जाणते आणि सोलनॉइड व्होल्व नियंत्रित करून ऑक्सिजन पुरवठा नियमित करते.

वजनाला हलक्या आणि सहज वाहून नेता येऊ शकणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरमधून  नाकपुड्याद्वारे ऑक्सिजन दिला जातो. एक लिटर आणि एक किलो वजनाच्या 150 लिटर ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या प्रणालीपासून ते 10 लिटर आणि 10 किलो वजनाच्या 1500 लिटर ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या आणि प्रती मिनिट दोन लिटर वेगाने 750 मिनिटापर्यंत राहू शकणाऱ्या अशा विविध आकारात ही प्रणाली उपलब्ध आहे.

स्थानिक परिस्थितीत वापरता येण्यासाठी स्वदेशात विकसित करण्यात आलेली ही प्रणाली अतिशय मजबूत तर आहेच त्याचबरोबर स्वस्तही आहे. उद्योगामध्ये याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू आहे. सध्याच्या कोविड महामारीच्या काळात ही प्रणाली म्हणजे एक वरदान ठरणार असून मध्यम संसर्ग असणाऱ्या कोरोना रुग्णासाठी घरी नियंत्रित 2/5/7/10 लिटर प्रती मिनिट ऑक्सिजन वहन उपचार पद्धतीसाठी याचा वापर शक्य होणार आहे. एसपीओ2 कमी झाल्यास ऑक्सिमिटर धोक्याची सूचना देणार आहे. ते आपोआप ओ2 पातळी कमी/जास्त करेल.

उपलब्धता आणि सामान्यासाठी वापरण्यासाठी सुलभ अशा या सुविधेमुळे ही प्रणाली, रुग्णाच्या एसपीओ2 पातळीवर देखरेख करण्यासाठी डॉक्टर आणि निम वैद्यकीय यंत्रणेवरचा ताण कमी करणार आहे. वापरण्यासाठी सोप्या अशा ऑक्सिजन पुरवठा प्रणालीमुळे, अतिशय ताण असणाऱ्या वैद्यकीय संसाधनासाठी हे वरदान ठरणार आहे. याचा प्रसार,देशात मोठ्या संख्येने असणाऱ्या कोविड रुग्णासाठी व्यवस्थापन संकट कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content