Homeहेल्थ इज वेल्थभारतात गेल्या आठवड्यात...

भारतात गेल्या आठवड्यात फक्त 223 कोविड रुग्ण!

जगभरात आढळून आलेल्या SARS-CoV-2 विषाणूच्या उत्परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांनी कोविड-19 ची जागतिक आणि देशांतर्गत परिस्थिती, नवीन उत्परिवर्तित विषाणूचा प्रादुर्भाव आणि सार्वजनिक आरोग्यावरील त्याचा परिणाम, याचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती. जागतिक स्तरावर गेल्या 7 दिवसांमध्ये कोविड-19 च्या एकूण 2,96,219 नवीन रुग्णांची नोंद झाली, मात्र जागतिक लोकसंख्येमध्ये जवळजवळ 17% वाटा असलेल्या भारतात गेल्या आठवड्यात कोविड-19 च्या केवळ 223 (जगातील एकूण नवीन रुग्णांच्या 0.075%) नव्या रुग्णांची नोंद झाली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सचिवांनी (आरोग्य), जगभरात आढळून आलेल्या BA.2.86 (पिरोला) आणि EG.5 (इरीस) या SARS-CoV-2 विषाणूच्या उत्परिवर्तित प्रकारांसह जगभरातील कोविड-19 बाबतच्या परिस्थितीची माहिती दिली. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार EG.5 (इरीस) या उत्परिवर्तित विषाणूचा जगातील 50 देशांमध्ये, तर BA.2.86 (पिरोला) चा चार देशांमध्ये प्रादुर्भाव नोंदवण्यात आल्याचे त्यांनी अधोरेखित केले. 

ते पुढे म्हणाले की, देशाची कोविड-19 च्या नव्या रुग्णांची दैनंदिन सरासरी 50 पेक्षा कमी आहे, आणि कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा साप्ताहिक दर 0.2% पेक्षा कमी राखण्यामध्ये आपण यश मिळवले आहे. भारतात प्रादुर्भाव असलेल्या कोविड विषाणूच्या विविध उत्परिवर्तित प्रकारांच्या जनुकीय क्रमनिर्धारणाचा देखील यावेळी आढावा घेण्यात आला.

सविस्तर चर्चेनंतर डॉ. पीके मिश्रा यांनी यावर भर दिला, की देशातील कोविड-19 ची परिस्थिती स्थिर आहे, आणि देशातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सज्ज आहे, अशा वेळी राज्यांनी ILI/SARI च्या स्थितीकडे लक्ष ठेवून, जनुकीय क्रमनिर्धारणाच्या कामाला गती द्यावी, जगात आढळून येणाऱ्या विषाणूच्या नवीन प्रकारांकडे लक्ष ठेवावे आणि कोविड-19 च्या चाचणीसाठी पुरेसे नमुने पाठवावेत.   

Continue reading

आशाताईंवर आज संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय संगीतसृष्टीतील एका युगाचा रविवारी अंत झाला. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण सन्मानाने गौरवलेल्या, जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे मुंबईत निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, बहुअवयव निकामी (मल्टी-ऑर्गन फेल्युअर) होऊन त्यांचे...

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...
Skip to content