Homeहेल्थ इज वेल्थसावधान! मुंबईत कोविड...

सावधान! मुंबईत कोविड पुन्हा वाढतोय!!

मुंबई महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसात कोविडबाधितांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर विशेष करून विविध उत्सव व सणांच्या काळात कोविड प्रतिबंधाबाबत नागरिकांनी आत्यंतिक काळजी घ्यावी. तसेच कोविडबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आणि कोविडची लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींनी तातडीने आपली कोविडविषयक वैद्यकीय चाचणी करवून घ्याव्यात, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

पालिकेच्या अखत्यारीतील ज्या २६० चाचणी केंद्रांवर कोविडविषयक वैद्यकीय चाचणी मोफत करण्यात येते, त्या केंद्रांचे पत्ते महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या नियंत्रण कक्षांशी (Ward War Room) संपर्क साधल्यानंतरदेखील आपल्या नजीकच्या चाचणी केंद्राचा पत्ता मिळू शकतो. कोविडची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नागरीकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे आणि वारंवार हात साबणाने स्वच्छ धुऊन घ्यावेत असे आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी केले आहे.

कोविड-१९, या साथरोगाच्या प्रसारास आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेद्वारे सातत्याने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनांचा एक प्रमुख भाग आहे, तो म्हणजे कोविडविषयक वैद्यकीय चाचण्यांचा! पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनानुसार कोविडविषयक वैद्यकीय चाचण्या करण्याची कार्यवाही व व्यवस्थापन सातत्याने अधिकाधिक प्रभावीपणे करण्यात येत आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात मार्च २०२०पासून करण्यात येत असलेल्या वैद्यकीय चाचण्यांनी नुकताच एक कोटींचा टप्पा पार केला आहे. ‘कोविडची बाधा झाल्याचे निदान जेवढ्या लवकर होईल, तेवढ्याच लवकर संबंधित व्यक्तीचे विलगीकरण करता येते. त्यामुळे या बाधित व्यक्तीपासून इतरांना बाधा होण्यास प्रतिबंध होतो. हीच बाब प्रामुख्याने लक्षात घेऊन कोविडविषयक चाचणी करून घेण्याबाबत पालिका सातत्याने जनजागृती करीत आहे. महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या २६०पेक्षा अधिक चाचणी केंद्रांवर या चाचण्या पूर्णपणे मोफत करण्यात येत आहेत. ही केंद्रे पालिकेच्या रुग्णालयांमध्ये, दवाखान्यांमध्ये कार्यरत आहेत.

त्याचबरोबर मुंबईत इतर खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्येदेखील या चाचण्या निर्धारीत शुल्क आकारून करण्यात येत आहेत. या सर्व चाचण्यांचे निकाल चाचणीचा निकाल आल्यापासून २४ तासांच्या आत केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर ‘अपलोड’ करणे गरजेचे आहे.

कोविडविषयक वैद्यकीय चाचण्या कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा महत्त्वाचा भाग असल्यामुळे कोविडची लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींनी किंवा बाधित व्यक्तीच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तातडीने आपली कोविड चाचणी करवून घ्यावी. सण-उत्सवांच्या निमित्ताने किंवा अन्य कारणांमुळे बाहेरगावी जाऊन परतलेल्या व्यक्तींनी आपली कोविडविषयक वैद्यकीय चाचणी करवून घ्यावी. त्यामुळे वेळीच निदान झाल्यामुळे वेळच्यावेळी औषधोपचार मिळण्यासह संबंधित व्यक्तीला विलगीकरणात ठेवल्यामुळे त्या व्यक्तीपासून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता कमी होईल.

ज्या ज्येष्ठ नागरिकांना सहव्याधी आहेत (उदाहरणार्थ फुफ्फुसांचे आजार, हृदयविकार, यकृत विकार, मूत्राशयाचे आजार, मधुमेह, मेंदूविकार, रक्तदाब) अशा व्यक्तींनी आणि प्रसूतीकाळ नजीक असलेल्या गर्भवती माता, डायलिसिस रुग्ण, कर्करूग्ण इत्यादी जोखीम गटातील नागरिकांनी अधिकाधिक काळजी घ्यावी, असे आवाहनही पालिका प्रशासनाने केले आहे.

Continue reading

आशाताईंना देशभरातून भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी पसरताच देशभरातून शोकसंदेशांचा गहिवर लोटला. राष्ट्रपती भवनापासून ते सामान्य चाहत्यांपर्यंत, आणि मुंबईच्या गल्लीबोळांपासून ते आखाती देशांतील रेस्तराँपर्यंत, सर्वांनीच या महान स्वराला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशाताई रुग्णालयात दाखल...

आशाताईंवर आज संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय संगीतसृष्टीतील एका युगाचा रविवारी अंत झाला. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण सन्मानाने गौरवलेल्या, जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे मुंबईत निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, बहुअवयव निकामी (मल्टी-ऑर्गन फेल्युअर) होऊन त्यांचे...

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...
Skip to content