मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने साहित्यातील प्रेमरंग, या विषयावर साहित्यरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव येत्या शनिवारी, ८ फेब्रुवारी आणि रविवारी, ९ फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या गोखले सभागृहात होईल.
८ फेब्रुवारीला थोर साहित्यिक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या साहित्यातील प्रेमाच्या विविध छटा उलगडून दाखवणारे व्याख्यान आणि अभिवाचन होईल. जयवंत दळवी– अस्पर्शित प्रीतीचा शोध, या विषयावरील या कार्यक्रमाची संकल्पना, संहिता आणि विवेचन डॉ. निर्मोही फडके यांचे आहे. ९ फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता `जिवलगा’ हा मराठी प्रेमगीतांचा वाद्यवृंद होईल. प्रवीण शृंगारपुरे आणि त्यांचे सहकारी त्याचे सादरीकरण करतील. अधिकाधिक साहित्यप्रेमींनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.