Homeहेल्थ इज वेल्थलठ्ठपणाच्या समस्येवर पंतप्रधान...

लठ्ठपणाच्या समस्येवर पंतप्रधान मोदींना ओमर अब्दुल्लांची साथ!

भारतात वाढत असलेल्या लठ्ठपणाच्या समस्येशी दोन हात करण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पुढाकार घेतला असून या कामात त्यांना भारतीय जनता पार्टीचे विरोधक नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची साथ मिळणार आहे.

आकाशवाणीवर रविवारी झालेल्या मन की बात, या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींनी देशातल्या लठ्ठपणाच्या समस्येकडे भारतवासियांचे लक्ष वेधलं. ही लठ्ठपणाची समस्या सोडवण्यासाठी खाद्यतेलाचा वापर शक्य तितका कमी करावा असे आवाहन त्यांनी केले. हे आवाहन करतानाच त्यांनी या लढाईला बळकटी येण्यासाठी जनजागृतीची गरज असल्याचे सांगितले. ही जनजागृती करण्यासाठी त्यांनी दहा जणांना नामांकित केले आहे. यामध्ये ओमर अब्दुल्ला यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांच्याव्यतिरिक्त या मान्यवरांमध्ये अभिनेता निरहुआ, नेमबाज मनु भाकर, वेटलिफ्टर मीराबाई चानू, अभिनेते मोहनलाल, इन्फोसिसचे अध्यक्ष नंदन नीलकेणी, अभिनेता माधवन, गायिका श्रेया घोषाल, सुधा मूर्ती यांनाही पंतप्रधानांनी खाद्य तेलाचा वापर कमी करण्याविषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे. या दहा जणांपैकी प्रत्येकाने इतर दहा जणांना नामांकित करावे. त्यांच्यातल्या प्रत्येकाने पुढे दहा-दहा जणांना नामांकित करावे. अशी नामांकनाची एक साखळी तयार होऊन त्या माध्यमातून ही जनजागृती करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

पंतप्रधान

एक्सवर केलेल्या एका आवाहनात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येशी लढण्याची तातडीची गरज आहे. यासाठी खाद्यतेलाचा वापर कमी करायला हवा. या उद्देशाने एक चळवळ निर्माण करण्याची गरज आहे. या लढ्याला बळकटी देण्यासाठी आणि अन्नातला खाद्यतेलाचा वापर कमी करण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी ही चळवळ जास्तीतजास्त व्यापक व्हायला हवी. एकत्रितपणे आपण भारताला अधिक तंदुरुस्त आणि निरोगी बनवूया. फाईट ओबेसिटी!

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात 57% महिला आणि साधारण 47% पुरुष लठ्ठपणाच्या समस्येला तोंड देत आहेl. आपण जे खाद्यतेल वापरतो त्यामुळे आपले वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. समोसा, पकोडे, भजी, कचोरी असे तळलेले पदार्थ कटाक्षाने टाळले गेले पाहिजे. हे चवदार तर असतातच पण शरीराला हानिकारकही तितकेच असतात. शरीरामध्ये दिवसभरात खाद्यतेलाचे प्रमाण प्रत्येक व्यक्तीला साधारणतः 30 ग्रॅम इतके असायला हवे. याचाच अर्थ चार जणांच्य एका कुटुंबाला महिन्याला एक लिटर खाद्यातेल पुरेसे आहे. पण आज प्रत्यक्षात लोकांकडून दरमहा दहा-दहा लिटर खाद्यतेलाचा वापर होत आहे. हे प्रमाण कमी झाले तर वजन कमी होण्यासही हातभार लागेल आणि त्याकरीताच आता पंतप्रधान मोदी सरसावले आहेत.

Continue reading

सीएसटीएमला उभा राहणार छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली. युनेस्कोने शिवाजी महाराजांच्या देशातील १२ किल्ल्यांना जागतिक वारसा मानांकन दिले असून त्यात महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश आहे, अशी...

प्रवाशांना जगात सर्वात जलद बॅगा मिळणार नवी मुंबई विमानतळावर

महाराष्ट्रातल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या सप्टेंबर महिन्यात पहिले विमान उडण्याची शक्यता असून याच विमानतळावर जगातली सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली निर्माण होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली विकसित करण्यात यावी आणि हे या...

महाराष्ट्रात तयार होतोय देशातला सर्वात लांब बोगदा!

मुंबई-पुणे प्रवासाला गती देणारा यशवंतराव चव्हाण द्रूतगती महामार्ग नजीकच्या काळात अधिक गतीमान होणार आहे. या मार्गावरील घाटाचा पट्टा टाळणारा 'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातला एक चमत्कार आहे. या प्रकल्पातला एक बोगदा देशातला सर्वात लांब बोगदा असून याच प्रकल्पात देशातला सर्वात उंच...
Skip to content