Homeचिट चॅटआता पेटीएम देणार...

आता पेटीएम देणार रद्द केलेल्या ट्रेन तिकिटाचेही पैसे!

भारतातील अग्रगण्य पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी आणि क्यूआर व मोबाइल पेमेंट्सचा अग्रणी ब्रॅण्ड, पेटीएमची मालक असलेल्या वन ९७ कम्युनिकेशन्स लि.ने (ओसीएल) पेटीएम सुपर अॅप वापरकर्त्यांना ट्रेनचे तिकिट रद्द केल्यावर १०० टक्के परतावा देण्याची घोषणा केली.

याद्वारे ‘कॅन्सल प्रोटेक्ट’ कव्हरसह वापरकर्ते ट्रेन तिकिटाच्या नियोजित वेळेच्या किमान ६ तास आधी किंवा चार्ट तयार होण्यापूर्वी, यापैकी जे आधी असेल, पेटीएमद्वारे रद्द केलेल्या ट्रेन तिकिट बुकिंगवर १०० टक्के इन्स्टंट रिफंड क्लेम करू शकतात. ‘कॅन्सल प्रोटेक्ट’ प्रवाशांना कोणतेही प्रश्न न विचारता कुठेही, कधीही, नियमित आणि तत्काळ रेल्वे तिकिटे रद्द करणे शक्य आहे.

पेटीएमद्वारे वापरकर्ते पेटीएम यूपीआयच्या माध्यमातून ट्रेन तिकिटांवर शून्य पेमेंट शुल्कांचा आनंद घेऊ शकतात. वापरकर्ते तत्काळ तिकिटे बुक करू शकतात, लाइव्ह ट्रेन रनिंग स्टेटस तपासू शकतात, प्लॅटफॉर्म क्रमांक ट्रॅक करू शकतात आणि पेटीएम किंवा इतर व्यासपीठांवर बुक केलेल्या सर्व तिकिटांचे पीएनआरही तपासू शकतात.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content