Homeएनसर्कलआता पाठ्यपुस्तकांचीही पायरसी,...

आता पाठ्यपुस्तकांचीही पायरसी, 20 कोटींचा माल जप्त!

चित्रपटांची पायरसी केली जाते हे अनेकांना ठाऊक आहे. पण आता पाठ्यपुस्तकांचीही पायरसी केली जाते आणि तीही कोट्यवधींची, हेही उघड झाले आहे. एनसीईआरटीच्या पायरेटेड पाठ्यपुस्तकांची निर्मिती, वितरण आणि विक्रीमध्ये सहभागी असलेल्या लोकांवर कारवाई करत एनसीईआरटीने गेल्या 14 महिन्यांमध्ये संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पायरेटेड एनसीईआरटी पाठ्यपुस्तकांच्या 5 लाखांहून अधिक प्रती, प्रचंड प्रमाणात छपाईचा कागद आणि यंत्रसामग्री जप्त केली आहे. त्याचप्रमाणे पायरेटेड पाठ्यपुस्तकांचे मुद्रक, गोदाम मालक आणि किरकोळ विक्रेत्यांविरुद्ध विक्रमी 29 एफआयआर नोंदवले आहेत.

1957च्या कॉपीराइट कायद्याअंतर्गत दखलपात्र गुन्हा असलेल्या पाठ्यपुस्तकांच्या पायरसीविरुद्ध शून्य-सहिष्णुता धोरण स्वीकारत अशा गुन्हेगारांविरुद्धची मोहीम सुरू ठेवत एनसीईआरटीने उत्तर प्रदेश पोलिसांच्या सहाय्याने मुझफ्फरनगरमधील एका गोदामावर छापा टाकला आणि 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची 1.5 लाखांहून अधिक पायरेटेड पाठ्यपुस्तके, पायरेटेड पाठ्यपुस्तकांनी भरलेला एक ट्रक आणि दोन मोटारी तसेच मोठ्या प्रमाणावर प्रिंटिंग प्लेट्स जप्त केल्या. आठ आरोपींना घटनास्थळी अटक करण्यात आली. या कारवाईच्या अनुषंगाने सामलखा (हरियाणा) येथील एका छापखान्यावरही छापा टाकण्यात आला आणि पायरेटेड पाठ्यपुस्तकांच्या छपाईसाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या प्रमाणातील प्रिंटिंग प्लेट्स, पायरेटेड पाठ्यपुस्तकांच्या प्रती आणि यंत्रसामग्री जप्त करण्यात आली. पायरेटेड पाठ्यपुस्तकांचे उत्पादन, वितरण आणि विक्री करण्याच्या रॅकेटमागील सूत्रधारांची ओळख पटविण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

पायरेटेड पाठ्यपुस्तकांची छपाई कमी होण्यासाठी एनसीईआरटीने खालील पावले उचलली आहेत:

1. पाठ्यपुस्तकांच्या कागदाच्या आणि छपाईच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा;

2. पाठ्यपुस्तकांची वेळेवर छपाई आणि बाजारात त्यांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता;

3. पायरेटेड पाठ्यपुस्तकांचे मुद्रक, वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांविरुद्ध सक्रिय कारवाई;

4. प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर पाठ्यपुस्तके एमआरपीवर वितरण शुल्काशिवाय उपलब्ध करणे;

5. पाठ्यपुस्तकांमध्ये आयआयटी कानपूरने विकसित केलेल्या तंत्रज्ञानआधारित अँटीपायरसी सोल्यूशनचा अवलंब.

Continue reading

हा पाहा महायुती सरकारचा दुटप्पीपणा!

देशातीलच नव्हे तर जगातील शास्त्रज्ञ व वैद्यकीय तज्ज्ञ यांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे कबुतरापासून माणसाच्या फुफ्फुसाला धोका निर्माण होतो, हे सिद्ध झाले आहे. न्यायालयाने योग्य निर्णय देत यावर बंदीही आणली असतानाही, दादरला एक समुदाय कबुतरांना खायला दाणे टाकून न्यायालयाच्या निर्णयाला...

कोमसाप मुंबईच्या अध्यक्षपदी विद्या प्रभू; जगदीश भोवड जिल्हा प्रतिनिधी

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा अध्यक्षपदी विद्या प्रभू यांची निवड झाली आहे. विद्यमान अध्यक्ष मनोज वराडे आणि विद्या प्रभू यांच्यात लढत झाली. त्यात विद्या प्रभू विजयी झाल्या. यावेळी मुंबई जिल्ह्याची कार्यकारिणीही निवडण्यात आली. केंदीय समितीवर जिल्हा प्रतिनिधी म्हणून जगदीश...

महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेसाठी नोंदवा 31 ऑगस्टपर्यंत सहभाग

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 3 नोव्हेंबर, 2025पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांंसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांंसाठी नाट्यसंस्थांकडून येत्या 31 ऑगस्ट, 2025पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती...
Skip to content