Homeहेल्थ इज वेल्थआता ५ मिनिटांत...

आता ५ मिनिटांत करा रक्ताच्या चाचण्या!

हेल्थनोवो ही एक उदयोन्मुख आरोग्यसेवा असून महाराष्ट्रातील प्राथमिक आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी काम करत आहे. हेल्थनोवोने एक वैद्यकीय उपकरण तयार केले आहे जे कोलेस्ट्रॉल, रक्तातला ग्लुकोज, हिमोग्लोबिन, युरिक ऍसिड आणि इतर महत्त्वाच्या तपासणी चाचण्या अवघ्या ५ मिनिटांत करू शकेल.

ही सेवा तंत्रज्ञानावर आधारित असून सर्वसामान्यांना सहजरित्या परवडण्याजोगी आहे. यातूनच हेल्थनोवोने आरोग्य एटीएम ही संकल्पना रुढ केली असून त्या अंतर्गत वेगवेगळ्या चाचण्या अत्यंत कमी वेळेत अधिक परिणामकारकरित्या करता येतात. ही सेवा सोयीच्या वेळेत आणि महाराष्ट्रातील अधिकाधिक भागात घेणे शक्य होत आहे. याअंतर्गत रायगड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अशा १० हेल्थ एटीएम सुरु आहेत, जेणेकरून वेगवेगळ्या तालुक्यांना स्क्रीनिंगची सुविधा उपलब्ध देण्याची योजना आहे. त्यात डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचारी यांचा समावेश आहे.

या उपक्रमातून तालुका स्तरावर स्क्रीनिंग डायग्नोस्टिक सुविधा मिळणे सहज शक्य होत आहे. या मशीन ५ मिनिटांत निकाल देतात. साध्या रक्त चाचण्यांचे निकाल मिळविण्यासाठी आता २ किंवा ३ दिवसांची प्रतिक्षा इथल्या नागरिकांना करावी लागत नाही.  हेल्थनोव्हो आता विविध जिल्ह्यांमध्ये हेल्थ एटीएम बसवून संपूर्ण महाराष्ट्रात आपले पाऊल विस्तारणार आहे.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content