Homeहेल्थ इज वेल्थकोरोना रूग्णांचे नमुने...

कोरोना रूग्णांचे नमुने रोजच्या रोज जिनोम सिक्वेन्सिंगसाठी!

अमेरिका, चीन, जपान यासारख्या देशांत कोरोना नव्याने उफाळल्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने आज सर्व राज्यांना तेथे आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या विषाणूंचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्याचे आवाहन केले आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना याबाबतचे पत्र पाठवले असून त्यांना तेथे आढळून येणाऱ्या प्रत्येक कोरोना रुग्णाच्या विषाणूंचे नमुने सार्स covid-2 जिनॉमिक्स कॉन्सॉर्टिअम नेटवर्कच्या प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठवण्याचे सूचना केल्या आहेत. हे नमुने रोजच्या रोज पाठवले जावेत असे त्यांनी म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून जपान, अमेरिका, दक्षिण कोरिया, ब्राझील, चीन आदी देशांमध्ये कोरोना नव्याने उफाळत आहे. कोरोनाची ही लाट पाहता त्यांच्या विषाणूंनी नवीन रूप धारण केले आहे की काय, आणि भारतात आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये हे नवीन विषाणू तर नाहीत ना याची पडताळणी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाने हे आवाहन केले आहे.

राज्य सरकारही नेमणार टास्क फोर्स

नागपूरमध्ये महाराष्ट्र विधानसभेतही आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चीन तसेच इतर काही राष्ट्रांत नव्याने उफाळलेल्या कोरोनाची चिंता व्यक्त करताना राज्य सरकारने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. यासाठी एखादी समन्वय समिती स्थापन करावी अशी सूचनाही त्यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला प्रतिसाद देत सरकार यावर गांभीर्याने विचार करेल. यासाठी लवकरात लवकर एक टास्क फोर्स किंवा समन्वय समिती गठीत केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.

Continue reading

आशाताईंना देशभरातून भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी पसरताच देशभरातून शोकसंदेशांचा गहिवर लोटला. राष्ट्रपती भवनापासून ते सामान्य चाहत्यांपर्यंत, आणि मुंबईच्या गल्लीबोळांपासून ते आखाती देशांतील रेस्तराँपर्यंत, सर्वांनीच या महान स्वराला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशाताई रुग्णालयात दाखल...

आशाताईंवर आज संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय संगीतसृष्टीतील एका युगाचा रविवारी अंत झाला. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण सन्मानाने गौरवलेल्या, जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे मुंबईत निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, बहुअवयव निकामी (मल्टी-ऑर्गन फेल्युअर) होऊन त्यांचे...

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...
Skip to content