Homeहेल्थ इज वेल्थआता धर्मादाय रुग्णालयांची...

आता धर्मादाय रुग्णालयांची माहिती मिळणार ‘आरोग्य आधार’ ॲपवर

आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात सवलतीच्या दराने वैद्यकीय सेवा दिल्या जातात. या रुग्णालयांची अद्ययावत माहिती रुग्णांना ‘आरोग्य आधार’ या ॲपद्वारे तत्काळ मिळणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.

धर्मादाय रुग्णालयांतर्गत सुविधा रुग्णांपर्यंत पोहोचविणे, हॉस्प‍िटल रजिस्ट्रेशन पोर्टलचे सादरीकरण, एनएचएम पीआयपी २०२३-२४ सद्यस्थितीतील प्रगतीचा आढावा, आरोग्य संस्थांच्या बृहत आराखड्याचे सादरीकरण संदर्भात बैठकीचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते, यावेळी डॉ. सावंत बोलत होते. धर्मादाय रुग्णालयाच्या कार्याबाबत आदर्श कार्यप्रणाली तयार करताना पारदर्शी काम व्हावे, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. धर्मादाय रुग्णालयाची माहिती तत्काळ उपलब्ध व्हावी यासाठी, ‘आरोग्य आधार’ ॲप रुग्णांच्या सेवेत येणार आहे. या ॲपद्वारे रुग्णांना जवळचे धर्मादाय रुग्णालय, तिथे उपलब्ध असलेल्या सुविधा, उपलब्ध खाटांची संख्यांची माहिती तसेच तत्काळ खाट राखीव करता येणार आहे. वॉर रुम, आरोग्यदूत, धर्मादाय रुग्णालय आणि व्यवस्थापनाला यासंदर्भात माहिती एकाचवेळी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तालुकास्तरावर आरोग्य सुविधेसाठी तालुका किंवा जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार जिल्हा रुग्णालय, कर्करोग रुग्णालय, केमोथेरपी डे-केअर सेंटर, रेडिओ थेरपी ट्रिटमेंट युनिटसाठी प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश डॉ. सावंत यांनी दिले. तसेच नर्सिंग होम ॲपमध्ये रुग्णालय आणि डॉक्टरांच्या प्रमाणपत्रांची त्रयस्थ पडताळणी करण्यात यावी. पदवीच्या सत्यतेची तपासणी करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, महिला व बाल आरोग्य केंद्र यांची मोजणी करण्यात आली आहे. केवळ अंतर आणि जिल्हा यानुसार केंद्रांची मागणी न करता जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राची मागणी करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीस आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त धीरजकुमार, धर्मादाय आयुक्त महाजन आदी उपस्थित होते.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content