Homeमुंबई स्पेशलउद्या मुलुंडच्या काही...

उद्या मुलुंडच्या काही भागात पाणी नाही!

मुंबईतल्या मुलुंड (पश्चिम) वीणा नगर येथील योगी हिल मार्गावरील प्रस्‍तावित विकास नियोजन रस्‍त्‍यावरील ६०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या जलवाहिनी जोडणीचे काम प्रस्‍तावित आहे. उद्या शनिवार, १९ जुलैला सकाळी १० ते रात्री १० या बारा तासांच्‍या कालावधीत जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेतले जाणार आहे. या कामामुळे टी विभागातील मुलुंड (पश्चिम) येथील काही भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

‘टी’ विभागातील पाणीपुरवठा खंडित होणाऱ्या परिसरांचा तपशील–

मुलुंड (पश्चिम) येथील मलबार हिल मार्ग, स्‍वप्‍ननगरी, वीणा नगर, मॉडेल टाऊन मार्ग, योगी हिल मार्ग, घाटीपाडा, बी.आर. मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७ ते दुपारी १)
(सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा राहणार बंद)

संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. पाणीपुरवठा बंद असण्याच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे. तसेच, पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्‍हणून ३ ते ४ दिवस पाणी गाळून व उकळून वापरावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

Continue reading

हृतिक-कियाराचे आजवरचे सर्वात देखणे प्रेमगीत ‘आवन जावन’!

यशराज फिल्म्सने ‘वॉर 2’ या बहुचर्चित चित्रपटाचं पहिलं गाणं ‘आवन जावन’ नुकतंच प्रदर्शित केलं असून, हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांची स्क्रीनवरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. गाण्याच्या हळव्या आणि मधुर चालीसोबत त्यातील इटलीच्या टस्कनीतील निसर्गरम्य ग्रामीण भागापासून...

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...
Skip to content