Homeहेल्थ इज वेल्थकोविडनंतर लगेचच जास्त...

कोविडनंतर लगेचच जास्त व्यायाम नको!

गंभीर स्वरूपाच्या कोविडमधून बरे झाल्यानंतर अशी लक्षणे असणाऱ्या सर्वांनी ताबडतोब त्यावर उपचार सुरू करावेत. मात्र, हे उपचार रुग्ण बरा झाल्यानंतर, तीन महिन्यांनी करावे. कोविडमधून बऱ्या झालेल्या रुग्णाने, लगेचच व्यायाम सुरु केल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आल्याच्या काही केसेस आढळल्याचे नवी दिल्लीतील, सेंट स्टिवन रुग्णालयात अस्थिरोग चिकित्सा विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेले डॉ. मॅथ्यू वर्गीस यांनी सांगितले.

जगभरात अद्यापही अनेक ठिकाणी कोविडशी लढा देणे सुरूच असताना यासंदर्भात आणखी एक शब्द सध्या सातत्याने ऐकू येत आहे, तो म्हणजे, ‘दीर्घकालीन कोविड’. सध्या, होत असलेला हा कोविडचा प्रकार, डॉक्टर आणि रुग्ण दोघांसाठीही चिंतेचा विषय ठरला आहे. नवी दिल्लीतील, सेंट स्टिवन रुग्णालयात अस्थिरोग चिकित्सा विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेले डॉ. मॅथ्यू वर्गीस यांनी ट्विटरवर कोविडनंतर येणाऱ्या शारीरिक समस्यांविषयी माहिती देताना पहिल्यांदा (लॉन्ग कोविड) हा शब्दप्रयोग केला. रुग्ण कोविडमधून बरा झाल्यानंतर, त्याला हा संसर्ग झाल्याच्या चार ते पाच आठवड्यानंतर अशी लक्षणे दिसू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.

लॉन्ग- म्हणजेच दीर्घकालीन कोविड म्हणजे नेमके काय?

फुफ्फुसे आणि क्षयरोग तज्ज्ञ, डॉ. निखिल नारायण बांते, यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, कोविड-19मधून बरे झाल्यानंतर, सुमारे 50 ते 70 टक्के रुग्णांना सौम्य किंवा कधी अगदी तीव्र स्वरूपाची लक्षणे जाणवू शकतात. ज्या रुग्णांना कोविडचा मध्यम अथवा तीव्र स्वरूपाचा संसर्ग झाला होता, त्यांच्या शरीरात ही लक्षणे आढळल्याचे निरीक्षण आहे.

ज्यांना बराच काळ कोविड विषाणूचा संसर्ग झाला होता, असे किंवा जे या विषाणूचे अधिक काळ वाहक होते, अशा रुग्णांकडून सातत्याने अशा तक्रारी येत आहेत, की त्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही त्यांना अद्याप निरोगी वाटत नाही. तसेच, अशा रुग्णांना थकवा, श्वास घेण्यास त्रास होणे, अंगदुखी, डोकेदुखी, हृदयाचे असमतोल ठोके, छातीत दुखणे, डायरिया, रक्ताच्या गुठळ्या होणे, वास आणि चव घेण्याची शक्ती कमी होणे अशी काही लक्षणे असल्याची तक्रार अनेक रुग्णांनी केली आहे, असे डॉ.  वर्गीस यांनी सांगितले.

अशा रुग्णांना केवळ शारीरिकच नाही, तर ‘दीर्घकालीन कोविड’ असलेल्याना मानसिक परिणामही जाणवत आहे. यात, अस्वस्थपणा, निराश वाटणे, विस्मृती अशी लक्षणे आहेत. मात्र, विस्मृती म्हणजे, अल्झायमर्ससारखा आजार नव्हे, तर ‘दीर्घकालीन कोविड’ असलेल्या शरीरातील अॅस्ट्रोसाइट्स (मज्जासंस्थेशी संबंधित नसलेल्या पेशी) पेशींच्या नुकसानाचा परिणाम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. वर्गीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला अशाप्रकारचा दीर्घकालीन कोविड केवळ ज्येष्ठ नागरिकांना होत असे. मात्र, आता सर्व वयोगटातील रुग्णांमध्ये तीच लक्षणे आढळत आहेत. कावासाकी आजार किंवा रक्तामध्ये गुठळ्या होण्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये अधिक आहे. मात्र, मुलांना त्यांच्या मानसिक आरोग्याविषयी सांगता येत नसल्याने, त्यांच्यावर काही मानसिक परिणाम होत आहे का, हे शोधणे जरा अवघड असते.

ही सगळी लक्षणे कोविडमुळेच आहेत, की इतर कशामुळे, हे निश्चित तपासण्यासाठी, डॉक्टर्स रुग्णांमध्ये कोविड संसर्ग होण्यापूर्वी ही लक्षणे, सौम्य स्वरूपात का होईना, पण होती का ते तपासतात, ज्यावरुन त्यांना याचा अंदाज बांधता येतो, असेही त्यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्यविषयक सूचना

‘दीर्घकालीन कोविड’नंतर, सांध्यामध्ये सूज किंवा वेदना हेही एक महत्त्वाचे लक्षण अनेक रुग्णांना जाणवत आहे. कोविड झाल्यावर आपल्या शरीरात तयार होणारी प्रतिजैविके आपल्या इतर चांगल्या पेशींवरही हल्ला करतात, त्यामुळे हे होते. मात्र, अनेकजण सांधेदुखीपेक्षाही, अंगदुखी होत असल्याची तक्रार करतात. कोविडवर उपचार करताना स्टेरॉईडचा अधिक वापर झाल्यास, त्यामुळेही असा त्रास होऊ शकतो. अव्हास्क्यूलर न्यूरॉसिस, या आजारामुळे, शरीरातून हाडांना होणारा रक्तपुरवठा तात्पुरता किंवा कायमस्वरुपी बंद होऊ शकतो. उपचारादरम्यान स्टेरॉईडच्या अतिवापरामुळेदेखील, हा आजार होत असल्याचे लक्षात आले आहे, असेही डॉ. वर्गीस यांनी सांगितले.

आपण आपली हाडे मजबूत कशी ठेवू शकतो याविषयीही त्यांनी माहिती दिली. व्यक्तीच्या वयाच्या 25 वर्षांपर्यंत, त्याच्या शारीरिक हालचाली, व्यायाम, यावर त्याच्या हाडांची ताकद अवलंबून  असते. त्यासाठीच तरुणांनी शारीरिक व्यायाम, खेळ अशा गोष्टी कराव्यात. प्रत्येक वयाच्या व्यक्तीसाठी, रोज किमान अर्धा तास चालणे अत्यंत आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

आहाराविषयी बोलताना ते म्हणाले, की आपल्याला आहारात, प्रथिने, कॅल्शियम आणि ड जीवनसत्वयुक्त आहार घ्यायला हवा. दूध, दुग्धजन्य पदार्थ, सुकामेवा यातूनदेखील मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळते. मात्र, ड जीवनसत्व खाताना एक काळजी घ्यायला हवी. हे मेद-विरघळवणारे जीवनसत्व असून ते आपल्या शरीरात साचून राहू शकते, ज्याचे इतर काही दुष्परिणाम होऊ शकतात. सूर्यप्रकाशही ड जीवनसत्व मिळवण्याचा उत्तम स्त्रोत आहे. मात्र, आज प्रदूषणामुळे हा सूर्यप्रकाश आपल्यापर्यंत योग्यप्रकारे पोहोचू शकत नाही.

केंद्र सरकारकया विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रकाशित झालेली डॉ. वर्गीस यांची पूर्ण मुलाखत बघण्यासाठी इथे क्लिक करा.

कोविडनंतरची लक्षणे, त्यांचा सामना कसा करायचा आणि कोविडमधून बरे होण्यासाठी पोषक आहार कसा फायदेशीर ठरतो, हे बघण्यासाठी इथे क्लिक करा.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content