Homeचिट चॅटनितेश राणेंकडून ‘मातोश्री’च्या...

नितेश राणेंकडून ‘मातोश्री’च्या अंगणातच सेनेला दणका!

भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी शिवसेनेला मातोश्रीच्या अंगणातच दणका दिला.

शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती बाळा सावंत यांनी काल असंख्य शिवसैनिकांसह विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशासाठी आमदार नितेश राणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या पक्षप्रवेशावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, पक्षाचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर, मयूर बागेरीया उपस्थित होते.

शिवसेनेचे आमदार प्रकाश ऊर्फ बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती यांनी पतीच्या निधनानंतर वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून पोटनिवडणूक लढविली व जिंकली होती. तेव्हा काँग्रेसकडून निवडणूक लढविणारे नारायण राणे यांचा त्यांनी पराभव केला होता. मात्र, नंतर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना उमेदवारी नाकारली. परिणामी तृप्ती सावंत अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उभ्या ठाकल्या आणि तेथे शिवसेनेला आपली जागा गमवावी लागली. काँग्रेसचे झिशान सिद्दिकी तेथून विजयी झाले.

आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत करण्याच्या प्रयत्नात आमदार नितेश राणे यांनी तृप्ती सावंत यांनाच भाजपात आणले. सावंत यांच्या पक्षप्रवेशानंतर आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट केले. त्यात त्यांनी या पक्षप्रवेशाचा उल्लेख ‘बेगडी हिंदुत्वाकडून भगव्या हिंदुत्वाकडे!’, असा टोला शिवसेनेला लगावला.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content