Homeकल्चर +राज्य बालनाट्य स्पर्धेच्या...

राज्य बालनाट्य स्पर्धेच्या वाशी केंद्रातून ‘न्युटनचा लायन’ प्रथम

२१व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत वाशी, नवी मुंबई केंद्रातून गुरुकुल द डे स्कूल, या संस्थेच्या न्यूटनचा लायन, या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच झुपर्झा, कल्याण या संस्थेच्या ठोंब्या ठोंबीची गोष्ट, या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी नुकतीच केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.

या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे वाशी, नवी मुंबई केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-

दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक वृशांक कवठेकर (नाटक-न्युटनचा लायन), द्वितीय पारितोषिक रश्मी घुले (नाटक- ठोंब्या ठोंबीची गोष्ट)

प्रकाशयोजनाः प्रथम पारितोषिक विनोद राठोड (नाटक- न्युटनचा लायन), द्वितीय पारितोषिक शंतनु साळवी (नाटक-वाचवाल का ?)

नेपथ्यः प्रथम पारितोषिक वैष्णवी देव (नाटक- न्युटनचा लायन), द्वितीय पारितोषिक संदेश पडवळ (नाटक- रोज हवे नवे नवे)

रंगभूषाः प्रथम पारितोषिक श्रृती गणपुले (नाटक- न्युटनचा लायन), द्वितीय पारितोषिक दिपक कुंभार (नाटक- ठोंब्या ठोंबीची गोष्ट)

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदकः दिया गीते (नाटक- न्युटनचा लायन) व मानस तोंडवळकर (नाटक-संग बांधे डोर), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे तनिष्का अपणकर (नाटक- शॉटकट), समिक्षा सोनावणे (नाटक- शपथ), हर्षिका वर्तेकर (नाटक- आदिबांच्या बेटावर), रिदीमा सातवे (नाटक-फुलराणी), प्रणती थोरात (नाटक-सरणार कधीत तम), अर्जुन आमडेकर (नाटक- केअर इज), स्वरांग दाबके (नाटक- न्युटनचा लायन), लाभ घुले (नाटक- ठोंब्या ठोंब्याची गोष्ट) धनुष पाटील (नाटक- राखेतून उडाला मोर) अंगद सिनलकर (नाटक-एका माळेचे मणी)

६ जानेवारी ते ९ जानेवारी, २०२५ या कालावधीत साहित्य मंदिर सभागृह, वाशी, नवी मुंबई येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण २३ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून चंद्रकांत सैंदाने, जुई बर्वे आणि  विजय शिंगणे यांनी काम पाहिले. स्पर्धा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मुख्य समन्वयक राकेश तळगावकर, मुकुंद जोशी, प्रियंका फणसोपकर, सचिन पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content