Homeचिट चॅटवृत्तपत्र विक्रेते सुनील...

वृत्तपत्र विक्रेते सुनील गांधी यांचे निधन

मुंबईतल्या बोरीवली पश्चिम येथील वृत्तपत्र विक्रेते सुनील ने. गांधी यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, वहिनी, पुतणे, पुतणी असा परिवार आहे.

मीरा रोड येथे वास्तव्यास असलेले सुनील गांधी पहाटेपहाटे बोरीवली येथे येऊन घरोघरी वर्तमानपत्रे पोहोचवून राजन घाडीगावकर यांच्यासमवेत बोरीवली पश्चिम येथे वृत्तपत्र विक्रीचे काम करीत होते. गेल्या बारा वर्षांपासून ते वर्तमानपत्रे विक्रीच्या व्यवसायात होते. गेल्या बुधवारी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. सुनील गांधी यांच्या निधनामुळे वृत्तपत्र व्यवसायात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content