Homeचिट चॅटवस्त्रोद्योग विभागाच्या नवीन...

वस्त्रोद्योग विभागाच्या नवीन संकेतस्थळाचा शुभारंभ

महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या नवीन संकेतस्थळाचा शुभारंभ वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काल मंत्रालयात करण्यात आला. यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग, उपसचिव श्रीकृष्ण पवार व संबंधित अधिकारी उपस्थित होते. राज्याच्या विकासात वस्त्रोद्योगाची महत्वाची भूमिका आहे. नवीन वस्त्रोद्योग धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करून महाराष्ट्र वस्त्रोद्योगाचे जागतिक केंद्र निर्मितीचे उद्दिष्ट ठेवावे, असे प्रतिपादन पाटील यांनी यावेळी केले.

या https://mahatextile.maharashtra.gov.in संकेतस्थळावर वस्त्रोद्योग विभाग, वस्त्रोद्योग आयुक्तालय, रेशीम संचालनालय महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ, महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, कार्यक्रम अंदाजपत्रकाची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगाच्या जागतिक बाजारपेठेतील माहितीबरोबरच उद्योजकांना स्पर्धात्मक राहण्यास नक्कीच मदत होईल, असेही ते म्हणाले.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content