Homeपब्लिक फिगरराष्ट्रवादीचे मोजक्या निमंत्रितांसाठी...

राष्ट्रवादीचे मोजक्या निमंत्रितांसाठी दोन दिवसीय शिबीर

राष्ट्रवादी काँग्रेसचे येत्या १८ व १९ जानेवारीला अडीचशे निमंत्रितांसाठी दोन दिवसीय शिबीर छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत दिली. या शिबिरात विद्यमान खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार, विधानसभा लढलेले सर्व उमेदवार, फ्रंटल व इतर सेलचे प्रमुख आणि विशेष निमंत्रित असणार आहेत, असे ते म्हणाले.

या शिबिरात पाच वर्षांचा रोडमॅप प्रदेशाध्यक्ष म्हणून तयार करणार असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले. सभासदनोंदणी मोहीम याच महिन्यात सुरू केली जाणार आहे. त्यानंतर संघटनात्मक कामाला गती द्यायची आहे. पक्षाचे काम फक्त राष्ट्रीय स्थितीपर्यंत मर्यादित न राहता समाजाच्या विविध क्षेत्रांशी निगडित असलेल्या बाबींवर लक्ष केंद्रित करत पक्षाची वाटचाल पुढच्या कालावधीत अधिक मजबुतीने कशी करता येईल यादृष्टीने विचार करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

आज राज्याच्या सेलप्रमुखांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. या बैठकीत आम्ही घेतलेल्या भूमिकेपासून ज्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवली होती त्याचे मूल्यमापन केले. विधानसभा निवडणुकीत केलेल्या कामाचा अहवालही घेतला. आगामी कालावधीत अधिक जबाबदारीने आपल्याला संघटनेची पाळंमुळं खोलवर रुजवण्याबाबत सूचना दिल्या. विधानसभेत आम्हाला ४१ जागांवर यश मिळाले. स्ट्राईकरेट दुसर्‍या क्रमांकावर राहिला आहे. पण पक्षाचा विस्तार राज्यभर करायचा आहे. काही जिल्ह्यांत आमचा आमदार नाही. काही जिल्ह्यांत एक-एक आमदार आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर होतील अशी अपेक्षा आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचे तटकरे म्हणाले.

या बैठकीत पक्षातील जे सहकारी आहेत त्यांच्याकडून सूचना व मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. संघटनेच्या पदावर जी संधी मिळाली आहे त्यात सक्रियपणे काम करण्याची सूचना केली. पक्ष आणि पक्षाची शिस्त यापुढे कसोशीने पाळली गेली पाहिजे अशी भूमिका बैठकीत मांडली. प्रवक्त्यांचीही स्वतंत्र बैठक घेतली. प्रवक्ते बोलतात त्यावेळी ते व्यक्तीगत मत नसते तर ते पक्षाचे मत असते. पक्षाची अधिकृत भूमिका असते. त्यामुळे प्रवक्त्यांची जबाबदारी मोठी असते. त्याबद्दल सूचना करतानाच कुटूंब म्हणून पुढच्या कालावधीत अधिक सक्षमपणे महाराष्ट्रात पक्षसंघटना वाढवण्याच्या दृष्टीने यशस्वी होऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार सना मलिक-शेख, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, प्रशांत पवार, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी आदी उपस्थित होते.

Continue reading

आशाताईंना देशभरातून भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी पसरताच देशभरातून शोकसंदेशांचा गहिवर लोटला. राष्ट्रपती भवनापासून ते सामान्य चाहत्यांपर्यंत, आणि मुंबईच्या गल्लीबोळांपासून ते आखाती देशांतील रेस्तराँपर्यंत, सर्वांनीच या महान स्वराला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशाताई रुग्णालयात दाखल...

आशाताईंवर आज संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय संगीतसृष्टीतील एका युगाचा रविवारी अंत झाला. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण सन्मानाने गौरवलेल्या, जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे मुंबईत निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, बहुअवयव निकामी (मल्टी-ऑर्गन फेल्युअर) होऊन त्यांचे...

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...
Skip to content