Homeन्यूज ॲट अ ग्लांसजम्मू-काश्मीर विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे...

जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर

जम्मू काश्मीर विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 16 उमेदवारांची पहिली यादी आज जारी केली. याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार समितीच्या अध्यक्षपदी शहनाज हुसैन शाह यांची नियुक्ती केली आहे. पक्षाचे जम्मू-काश्मीरचे प्रभारी ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी उमेदवारांची यादी तसेच प्रचार समितीच्या अध्यक्षांच्या नियुक्तीची घोषणा केली.

उमेदवारांची यादी थोडक्यात अशी..

  1. गांदरबल- एड. मोहम्मद अल्ताफ
  2. हजरतबल- शादीब हनीफ खान
  3. खनयार- निसार अहमद
  4. हब्बकांदल- जाहीद बशीर काशू
  5. लाल चौक- समीर अहमद बट
  6. चानापोरा- हाजी परवेज
  7. झादीबल- रियाज अहमद
  8. ईदगाह- कैसर अहमद बट
  9. सेंट्रल शालतेंग- नूर मोहम्मद शेख
  10. बडगाम- संजय कौल
  11. बीरवाह- नाझीर अहमद खान
  12. खान- शाहीब श्री हुसैन शाह
  13. चरार-आय-शरीफ- अब्दुल सलाम राथेर
  14. चादुद्रा- तारीक अहमद भट
  15. रियासी- ताराचंद
  16. माता वैष्णोदेवी- अशोक कुमार

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content