Homeचिट चॅटनार्को दहशतवाद देशासाठी...

नार्को दहशतवाद देशासाठी अत्यंत घातक!

मुंबईतल्या गोरेगावच्या झोपडपट्टीत आयआरएस अधिकारी समीर वानखेडे येताच लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच आपला नायक आणि मुलगा आल्याचे जाणवले. यावेळी समीर वानखेडे म्हणाले की, देशाची मुख्य समस्या दहशतवाद आणि ड्रग्ज आहे. जेव्हा हे दोन्ही एकत्र केले जातात तेव्हा त्याला नार्को दहशतवाद म्हणतात आणि नार्को दहशतवाद देशासाठी अत्यंत घातक आहे.

साई लीला फाऊंडेशनतर्फे गोरेगाव पूर्व येथील अशोक नगर येथे नशामुक्त भारत, या कार्यक्रमांतर्गत अंमली पदार्थमुक्ती, या विषयावर आयोजित चर्चासत्रात वानखेडे बोलत होते. यावेळी वानखेडे यांनी आपले अनुभव सांगितले व विविध प्रश्नांना थेट उत्तरे दिली. समाजाने अशा अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी यावेळी सांगितले.

गोरेगावसह अन्य ठिकाणीही अशा कार्यक्रमांसाठी पुढाकार घेण्याची ग्वाही आरपीआयचे नेते चंद्रशेखर कांबळे यांनी यावेळी दिली. आयोजक रश्मी उपाध्याय आणि श्रद्धा कदम यांनी सर्वांचे स्वागत केले.

Continue reading

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत...

भारत-पाक-अफगाणिस्तानच्या डोक्यावर हजार किमीचा असामान्य पाऊसपट्टा!

भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सध्या एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली हवामानप्रणाली सक्रिय झाली आहे. तब्बल एक हजार किलोमीटर लांबीचा एक सलग पाऊसपट्टा या तीन देशांवर पसरला असून हवामानतज्ज्ञांनी याला अत्यंत असामान्य घटना म्हणून संबोधले आहे. साधारणपणे अशा हवामानप्रणाली वक्राकार...
Skip to content