Homeटॉप स्टोरीपुण्यात मेट्रोच्या दुसऱ्या...

पुण्यात मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मोदी सरकारची मंजुरी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने काल दिल्लीत झालेल्या एका बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मार्गिका क्र. 4 (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि मार्गिका क्र. 4 ए (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) यांच्या कार्याला मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गिका क्र. 2 ए (वनाज ते चांदणी चौक) आणि मार्गिका क्र. 2 बी (रामवाडी-वाघोली-विठ्ठलवाडी) यांना मिळालेल्या मंजुरीनंतर मंजूर झालेला हा दुसरा महत्त्वाचा प्रकल्प (टप्पा) आहे.

28 उन्नत स्थानकांसह एकूण 31.636 किमी असलेल्या या मार्गिका क्र. 4 आणि 4 ए पुण्याच्या पूर्व, दक्षिण आणि पश्चिम भागांतील माहिती तंत्रज्ञान केंद्रे (आयटी पार्क), व्यावसायिक विभाग, शैक्षणिक संस्था आणि निवासी समूह यांना परस्परांशी जोडतील. हा प्रकल्प येत्या पाच वर्षांत पूर्ण केला जाणार आहे. याकरीता 9,857.85 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार तसेच बाह्य वित्तपुरवठा संस्था यांच्याकडून हा खर्च केला जाईल. या मार्गिका पुण्याच्या खराडी बाह्यवळण आणि नळ स्टॉप (मार्गिका क्र. 2) आणि स्वारगेट (मार्गिका क्र. 1) येथील कार्यान्वित आणि मंजुरीप्राप्त मार्गिकांशी जोडण्यात येतील. मेट्रो, रेल्वे आणि बस यांच्या जाळ्यांमध्ये सुरळीत बहुपद्धतीय जोडणी व्यवस्था सुनिश्चित करत या मार्गिकांसाठी हडपसर रेल्वेस्थानकामध्ये अदलाबदलीची सुविधा देण्यात येणार आहे. लोणी काळभोर आणि सासवड रोड यांच्या दिशेने भविष्यात जाणाऱ्या मार्गांना त्या पुढे जोडल्या जातील.

खराडी आयटी पार्क ते खडकवासल्याचा निसर्गरम्य पर्यटनपट्टा आणि हडपसरमधील औद्योगिक केंद्र ते वारज्यातील निवासी समूह यांना जोडणाऱ्या मार्गिका क्र. 4 आणि मार्गिका क्र. 4 ए पुण्यातील विविध भागांना एकत्र जोडतील. सोलापूर रस्ता, मगरपट्टा, सिंहगड, कर्वे मार्ग आणि मुंबई-बेंगळूरू महामार्ग या रस्त्यांवरून जाणारा हा प्रकल्प पुण्यातील सर्वात वर्दळीच्या मार्गांवर होणारी वाहतूककोंडी कमी करेल. सध्याच्या अंदाजानुसार, वर्ष 2028मध्ये मार्गिका क्र. 4 आणि मार्गिका क्र. 4 एचा दैनंदिन वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या 4.09 लाख असेल. वर्ष 2038मध्ये ही संख्या सुमारे 7 लाखांपर्यंत वाढेल. वर्ष 2048मध्ये 9.63 लाख लोक या मार्गांचा वापर करतील तर 2058मध्ये 11.7 लाखांपेक्षा अधिक प्रवासी हे मार्ग वापरतील, असा अंदाज आहे. यापैकी, 2028मध्ये खराडी-खडकवासला मार्गिकेचा वापर करणाऱ्यांची संख्या 3.23 लाख असेल. ती 2058मध्ये 9.33 लाखांपर्यंत वाढेल. याच काळात तर नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग मार्गाचा वापर करणाऱ्यांची संख्या 85,555वरुन 2.41 लाखांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज बांधण्यात आला आहे.

हा प्रकल्प महाराष्ट्र मेट्रो रेल महामंडळातर्फे (महा-मेट्रो) राबवण्यात येणार असून महामंडळ बांधकाम, वीजपुरवठा, यांत्रिक बाबी आणि प्रणालींशी संबंधित सर्वप्रकारचे काम करून घेणार आहे. स्थलाकृतिक सर्वेक्षणे आणि तपशीलवार संरचनाविषयक सल्ला यासारखी बांधकामपूर्व कामे याआधीच सुरू करण्यात आली आहेत. कालच्या मंजुरीमुळे पुण्यातील मेट्रोच्या जाळ्याचा विस्तार 100 किमीचा टप्पा पार करेल.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content