Homeचिट चॅटकोची येथे उद्या...

कोची येथे उद्या ‘मत्स्यसंपदा जागरुकता अभियान’ कार्यशाळा

मत्स्योद्योग विभागाचे सहसचिव (अंतर्देशीय मत्स्यव्यवसाय आणि प्रशासन) सागर मेहरा यांच्या हस्ते उद्या, 23 ऑक्टोबर 2023 रोजी कोची येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी अँड ट्रेनिंग (NIFPHATT) येथे मत्स्यसंपदा जागरुकता अभियानाबाबतच्या कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे.

या कार्यशाळेत केरळ सरकारच्या मत्स्योद्योग विभागाचे सहसंचालक (मध्य क्षेत्र) एस. महेश केरळमध्ये पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेद्वारे मत्स्यपालन विकास योजनांच्या अंमलबजावणीवर सादरीकरण करतील. सहसंचालक (अ‍ॅक्वाकल्चर) सेवानिवृत्त, सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण आणि सल्लागार (एनएफडीबी) एम. शाजी हे, केरळमधील पंतप्रधान मत्स्यसंपदा योजने अंतर्गत एक्वाकल्चर तंत्रज्ञान आणि त्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पद्धतीबाबत मार्गदर्शन करतील. विभाग प्रमुख आणि प्रमुख वैज्ञानिक, क्यूएएम विभाग, सीआयएफटी, कोची, डॉ. झीनुद्दीन हे, पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेच्या संदर्भात स्टार्ट-अप/उद्योजकतेमध्ये सीआयएफटीच्या उपक्रमांवर सादरीकरण करतील.

प्रक्रिया तंत्रज्ञ, NIFPHATT, कमलराज पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेच्या संदर्भात मूल्यवर्धन आणि क्षमता निर्मितीत NIFPHATT च्या उपाययोजनांबाबत सादरीकरण करतील. केरळच्या मत्स्यव्यवसाय विभाग, उपसंचालक (प्रशिक्षण) माजा जोस, संबंधितांशी संवाद साधतील आणि हितधारक कार्यक्रमादरम्यान त्यांच्या यशोगाथा सांगतील.

मच्छीमार, मच्छीमार प्रतिनिधी, मत्स्य-शेतकरी, उद्योजक, मच्छीमार सहकारी संस्थांचे नेते, व्यावसायिक, शास्त्रज्ञ आणि इतर हितधारक NIFPHATT येथे मत्स्यसंपदा जागरुकता अभियान कार्यशाळेदरम्यान परस्परसंवादात सहभागी होतील. 

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content