Homeचिट चॅट‘मेकिंग द डिफरन्स’...

‘मेकिंग द डिफरन्स’ पुरवते मोफत ऑक्सिजन!

कोरोना काळात रूग्णांना भासत असलेली ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन मेकिंग द डिफरन्स, या संस्थेने मुंबईत विविध ठिकाणी 20 मोफत ऑक्सिजन केंद्रे उभारली आहेत.

कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कित्येक रुग्णांचे मृत्यू झाले. अनेक रुग्णांचे हाल होत आहेत. अशा या कठिण प्रसंगी मेकिंग द डिफरन्स या संस्थेने मदतीचा हात पुढे करत मुंबई परिसरात 20 ठिकाणी कनेक्ट ऑक्सिजन या मोहिमेअंतर्गत ऑक्सिजन केंद्रे दिली आहेत.

मुंबईत ठिकठिकाणी उघडण्यात आलेल्या या ऑक्सिजन केंद्रांमधून गरजू रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन सिलिंडर व ऑक्सिजन कॉंसंट्रेटर पुरविण्यात येत आहेत. या कार्यात या संस्थेसोबत डोनेटकार्ट, माय ग्रीन सोसायटी आर एस एस जनकल्याण समिती, आय डी एफ़ व एन एस एस यांचादेखील मोलाचा हातभार लागला आहे.

या उपक्रमाबाबत बोलताना मेकिंग द डिफरन्स, या संस्थेचे संस्थापक दीपक विश्वकर्मा यांनी सांगितले की, सुरुवातीला मुंबईतील नागरिकांसाठी ही मोफत सेवा सुरू केली असून यानंतर महाराष्ट्रात विविध 100 ठिकाणी मोफत ऑक्सिजन सेवा सुरू करण्याचा आमचा मानस आहे. ज्या गरजू लोकांना मोफत ऑक्सिजन सिलिंडरची गरज आहे त्यांनी wwwe.mtdngo.org या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content