Homeडेली पल्समहाराष्ट्राची तनु भान...

महाराष्ट्राची तनु भान ठरली देशातली ‘सर्वोत्कृष्ट कॅडेट’

प्रजासत्ताकदिनाच्या परेडनंतर राजधानी दिल्लीतल्या करिअप्पा मैदानावर पार पडलेल्या एनसीसी रॅलीत महाराष्ट्राची कन्या तनु भान हिने आपल्या अद्वितीय कर्तृत्त्वाचा झेंडा फडकवला आहे. महाराष्ट्र संचालनालयाची ज्युनिअर अंडर ऑफिसर तनुने आर्मी विंगमधून (सीनियर विंग) देशात ‘सर्वोत्कृष्ट कॅडेट’ हा सर्वोच्च बहुमान प्राप्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका दिमाखदार सोहळ्यात तनु भानला सुवर्णपदक आणि मानाची ‘केन’ देऊन गौरविण्यात आले. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि एनसीसीचे महासंचालक ले. जनरल वीरेंद्र वत्स उपस्थित होते. देशातल्या १७ संचालनालयांमधल्या २० लाख कॅडेट्सच्या स्पर्धेत, तनुने आपल्या अद्वितीय शिस्तीच्या आणि अष्टपैलू कौशल्याच्या जोरावर हे ऐतिहासिक यश खेचून आणले. ‘राष्ट्र प्रथम – कर्तव्यनिष्ठ युवा’ या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत, तिने प्रशिक्षणातले सर्व कठीण टप्पे यशस्वीपणे पार करत देशात पहिला क्रमांक पटकावला. 

याप्रसंगी कॅडेट्सना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांच्या राष्ट्रभक्तीचा गौरव केला. समोर असलेले तरुण केवळ गणवेशातील कॅडेट्स नसून, ते ‘विकसित भारत’चे निर्माते आहेत. तुमचे परिश्रम, त्याग आणि अनुशासनच देशाला प्रगतीपथावर नेणारे मुख्य आधारस्तंभ आहेत. ही वचनबद्धता देशाला उज्ज्वल भविष्याकडे नेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content