Homeकल्चर +महाराष्ट्र राज्य हौशी...

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेची अंतिम फेरी आजपासून

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ६३वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा २०२४-२५ची अंतिम फेरी मुंबईतल्या वांद्र्याच्या रंगशारदा नाट्यगृहात आजपासून सुरू होत आहे. येत्या १५ मार्चपर्यंत या फेरीतल्या स्पर्धा चालणार असून त्यात रसिकांसाठी ४५ नाटकांची मेजवानी असेल. या नाटकांचा आनंद लुटण्यासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. विनामूल्य प्रवेशिका श्री शिवाजी मंदीर, दादर येथे उपलब्ध आहेत.

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा संपन्न होणार आहे. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यातील २३ केंद्रांवर आणि गोवा अशा एकूण २४ केंद्रांवर राज्य नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी आयोजित करण्यात आली होती. राज्य नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीत प्रथम व द्वितीय पारितोषिकप्राप्त दर्जेदार नाटकांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली आहे. अंतिम फेरीतील पहिले नाटक ‘पंचमवेद’ आज सायंकाळी ७.०० वाजता सादर होणार आहे. यानंतर दररोज सकाळी ११.३० वा. आणि सायंकाळी ७.०० वाजता नाटकांचे प्रयोग सादर होतील. या अंतिम फेरीमध्ये १२००हून अधिक हौशी कलाकार आपली कला सादर करणार आहेत.

राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीमधील स्पर्धक संघांचे मनोधैर्य वाढवण्याकरीता, त्यांना शुभेच्छा देण्याकरीता आणि विविध विषयांवरची विविध अंगी नाटके पाहण्याकरिता जास्तीतजास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content