Homeएनसर्कलआजपासून महाकुंभ! पर्यटकांसाठी...

आजपासून महाकुंभ! पर्यटकांसाठी एक अनोखी संधी!!

उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे आजपासून महाकुंभ 2025ला मोठ्या दिमाखात सुरूवात झाली. हा केवळ आध्यात्मिक संमेलनांसाठीच नव्हे तर जागतिक पर्यटनासाठीही एक महत्त्वाचा कार्यक्रम बनविण्यासाठी केंद्र सरकारचे पर्यटन मंत्रालय सज्ज झाले आहे. हा कार्यक्रम साजरा करताना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने पर्यटन मंत्रालय अनेक उपक्रम राबवत आहे. महाकुंभ हे जगातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे  धार्मिक संमेलन असून ते भारतातील चारपैकी एका ठिकाणी दर 12 वर्षांनी आयोजित केले जाते. महाकुंभ-2025, हे पूर्ण कुंभ असून ते उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आज, 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी, या कालावधीत भरत आहे. जगभरातील लाखो भाविक, पर्यटक आणि यात्रेकरूंना आकर्षित करणारा हा महाउत्सव भारताचा सांस्कृतिक, आध्यात्मिक वारसा आणि पर्यटनक्षमता प्रदर्शित करण्याची एक अनोखी संधी आहे.

पर्यटन मंत्रालयाने महाकुंभ येथे 5000 चौरस फूटाचा अतुल्य भारत नावाचा पॅव्हेलियन उभारला आहे, ज्याद्वारे परदेशी पर्यटक, तज्ज्ञ, संशोधक, प्रवासी समुदायाला सुविधा मिळणार आहेत. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि कुंभमेळ्याचे महत्त्व अधोरेखित करत हा कुंभमेळा अभ्यागतांना समृद्ध करेल. या पॅव्हेलियनमध्ये देखो अपना देश, पीपल्स चॉईस पोलदेखील असेल, ज्याद्वारे इथे भेट देणाऱ्यांना भारतातील त्यांच्या आवडत्या पर्यटनस्थळांसाठी मतदानाद्वारे पसंती देता येईल.

महाकुंभला उपस्थित राहणारे विदेशी पर्यटक, अतिथींच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी, पर्यटन मंत्रालयाने एक समर्पित टोल-फ्री पर्यटक इन्फोलाइन (1800111363  किंवा 1363) उपलब्ध केली आहे. इंग्रजी आणि हिंदीव्यतिरिक्त ही टोल फ्री इन्फोलाइन आता दहा आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये तसेच तमिळ, तेलुगू, कानडी, बंगाली, आसामी आणि मराठीसह भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये कार्यरत आहे. लोकांनी या सोहळ्याचे अनुभव आणि क्षण इतरांना सामाईक करावे यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी #Mahakumbh2025 आणि #SpiritualPrayagraj हे विशेष हॅशटॅग वापरण्यात येत आहेत. समाजमाध्यमांवरील स्पर्धा, आयटीडीसी, उत्तर प्रदेश पर्यटन आणि इतर संस्थांबरोबर सहयोगी संदेश यामुळे सोहळ्याला प्रतिसाद वाढेल, अशी अपेक्षा आहे.

पर्यटन मंत्रालयानं, उत्तर प्रदेश राज्य पर्यटन विकास महामंडळ, आयआरसीटीसी आणि आयटीडीसीसारख्या प्रमुख पर्यटन भागीदारांच्या सहकार्याने विविध प्रकारची पर्यटन पॅकेजेस आणि सुखसोयीयुक्त निवास पर्याय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आयडीसीने, प्रयागराज इथं टेंट सिटीमध्ये अत्याधुनिक सोयींसह 80 निवास सुविधा उभारल्या आहेत तर आयआरसीटीसीनं यात्रेकरू आणि पर्यटकांच्या गर्दीला सामावून घेण्यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधांसह तंबू उभारले आहेत. या पॅकेजेसची माहिती डिजीटल माहितीपुस्तिकेत उपलब्ध आहे.

महाकुंभला येणाऱ्या पर्यटकांचा प्रवास सुरळीत होण्यासाठी पर्यटन मंत्रालयानं, भारतातल्या अनेक शहरांतून प्रयागराजचा हवाई संपर्क वाढवण्यासाठी अलायन्स एअरबरोबर भागीदारी केली आहे. त्यामुळे देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय पर्यटकांनाही सहज आणि सोयीस्करपणे कार्यक्रमस्थळी पोहोचता येईल. या दुर्मिळ संधीचा फायदा घेण्यासाठी, पर्यटन मंत्रालय महाकुंभाची भव्यता आणि आध्यात्मिक सार टिपण्यासाठी मोठ्या प्रमाणात छायाचित्रण आणि ध्वनिचित्रमुद्रण प्रकल्प हाती घेणार आहे. महाकुंभाची भव्यता दर्शवणारी आणि आध्यात्मिक आणि सांस्कृतिक स्थळ म्हणून प्रयागराजची पर्यटनक्षमता अधोरेखित करणारी छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफिती आंतरराष्ट्रीय तसंच राष्ट्रीय माध्यम मंचांवर मोठ्या प्रमाणात सामाईक केली जातील.

Continue reading

१ ऑगस्टला रूपेरी पडद्यावर झळकणार ‘मुंबई लोकल’!

मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता 'मुंबई लोकल' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून येत्या १ ऑगस्टला हा...

57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला पहिल्यांदा भेट देणार भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात तब्बल 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला तसेच गेल्या 60 वर्षांत ब्राझिलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील. 2 ते 9 जुलै 2025 असा पंतप्रधानांचा हा दौरा आहे. या कालावधीत ते घाना,...

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...
Skip to content