लोणावळ्यातील गोरगरीबांची मुले इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण घेऊ शकतील यासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. लोणावळ्यात सरकारी शाळा तसेच सेमी-इंग्रजी शाळा सुरू झाल्या पाहिजेत, असे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी सांगितले.
जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने लोणावळ्यात त्यांची संवादसभा झाली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.
लोणावळ्याला निसर्गाने भरभरून संपदा दिली आहे. महाबळेश्वर, पाचगणी, लोणावळा, माथेरान यासारख्या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी मी सतत प्रयत्नशील आहे. मावळ तालुक्यात २८०० कोटी रुपयांच्या विकासकामांची पूर्तता केली आहे. बोरघाट ते सिंहगड इन्स्टिट्यूटसमोरील काम जोमाने सुरू आहे, ज्या अंतर्गत टनेल आणि ब्रिज बांधले जात आहेत. याचा फायदा निश्चितपणे होईल. कोयना, भंडारदरा, पवना धरण येथे जलपर्यटनाचा विकास करण्याचा आमचा मानस आहे, असेही पवार म्हणाले.