Monday, October 28, 2024
Homeब्लॅक अँड व्हाईटएकाच वेळी झाली...

एकाच वेळी झाली ४६० ठिकाणी पशुविकास शिबिरे

भारतातील आघाडीच्या एसएमएफजी इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड (पूर्वीचे फुल्लरटन इंडिया क्रेडिट क. लि.)ने त्यांच्या ६व्या पशुविकास दिवशी सर्वात मोठे एकदिवसीय पशुविकास शिबिर आयोजित केले. ही शिबिरे १४ राज्यांमधील ४६०हून अधिक ठिकाणी एकाच वेळी आयोजित करण्यात आली आणि १ लाखांहून अधिक गुरांना आवश्यक आरोग्यसेवा पुरवण्यात आली.

भारतात, ८ कोटींहून अधिक कुटुंबे थेट दुग्धव्यवसायाशी निगडीत आहेत आणि या क्षेत्राच्या कार्यशक्तीमध्ये स्त्रियांचे प्रमाण ७०% आहे. या महिलांच्या प्रयत्नांचे स्मरण करण्यासाठी ६वा पशुविकास दिन ‘दुग्ध व्यवसायातील महिला’ म्हणून साजरा करण्यात आला. स्त्री पुरुष समानता आणि सामाजिक उन्नती साधण्यासाठी सर्वांचा सहभाग यावर भर देत हा उपक्रम ईएसजी चौकटीमधील सामाजिक पैलू प्रतिबिंबित करतो.

पशु निगा आणि उपचार यांच्या जोडीला एसएमएफजी इंडिया क्रेडिटने ३०,०००हून अधिक लोकांना लाभ मिळवून देत ४-१० फेब्रुवारी दरम्यान देशभरात ३००हून अधिक आरोग्य शिबिरांचे आयोजन केले. ६व्या पशुविकास दिवसाने १,२५,००० हून अधिक जीवनांना स्पर्श केला आणि त्यांच्यावर प्रभाव पाडला. या कंपनीचा वैविध्यपूर्ण कामगारसंच संपूर्ण भारताच्या ६०० शहरे आणि ६५,०००हून अधिक गावांमधील ग्राहकांना सेवा प्रदान करतात. त्यांचे लक्ष्य हे सर्वसमावेशक परिसंस्था निर्माण करून ऋणाद्वारे स्वप्नपूर्ती आणि उच्च कौशल्य प्रदान करून ग्रामीण जीवनाचे जीवनमान उंचावणे आहे.

पशुविकास दिनामध्ये देशभरातील ४०००हून अधिक कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला. हा उपक्रम राबविण्यासाठी एकाच दिवशी त्यांनी एकत्र येऊन स्वयंसेवेने काम केले. कंपनीच्या सामाजिक उपक्रमांबद्दल बोलताना, एसएमएफजी इंडिया क्रेडिट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक शंतनू मित्रा म्हणाले की, आमच्या ग्रामीण भागातील ग्राहकांपैकी ९०%हून अधिक ग्राहक या महिला आहेत. आमचे बरेच ग्राहक त्यांच्यासाठी उत्पन्नाचा एक मोठा स्रोत असलेल्या गुरे खरेदीसाठी कर्ज घेतात. आमचे समाज विकास कार्यक्रम बदलासाठी चालना देणारे घटक म्हणून काम करतात आणि ग्रामीण जीवनमान उंचावण्यावर, जीवनाची एकूण गुणवत्ता वाढवण्यावर आणि उत्पन्नाच्या प्रवाहांना चालना देण्यावर लक्ष केंद्रित करतात. पशुधन कल्याणाच्या पलीकडे आणि सेवा देत असलेल्या समुदायांच्या सर्वांगीण कल्याणासाठी कौशल्य विकास आणि आर्थिक साक्षरतेला सक्रियपणे प्रोत्साहन देत आहोत. एसएमएफजी इंडिया क्रेडिट कंपनीमध्ये आम्ही नाविन्यपूर्ण आणि शाश्वत सामाजिक-आर्थिक उपक्रमांद्वारे वंचित समाजामध्ये सर्वसमावेशक वाढीस प्रोत्साहन देऊन आमच्या ग्राहकांशी मजबूत संपर्क प्रस्थापित करण्यासाठी समर्पित आहोत.

पशु विकास दिनावर भाष्य करताना एसएमएफजी इंडिया क्रेडिट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामीनाथन सुब्रमण्यन म्हणाले की, आम्ही ग्रामीण विकास आणि मजबूत सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या आमच्या बांधिलकीबाबत ठाम आहोत. अग्रगण्य कर्ज पुरवठादार म्हणून सामुदायिक सर्वदूर उपक्रम, सर्वसमावेशक कार्यक्रम आणि एकसंधपणे काम करणारे वैविध्यपूर्ण कर्मचारी यांच्या माध्यमातून ईएसजीच्या सामाजिक पैलूचा उपयोग करण्याची आमची इच्छा आहे. ग्रामीण भागातील गुरेढोरे आणि त्यांच्या मालकांच्या विशिष्ट आरोग्यसेवा लक्षात घेऊन हा पशु विकास दिन आयोजित केला आहे. हा कार्यक्रम पशुपालकांच्या आकांक्षांना सामर्थ्य देतो आणि पशुधन उत्पादकता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे घरगुती उत्पन्नात वाढ होते. आमचा उद्देश केवळ आमच्या ग्राहकांचेच नव्हे तर मोठ्या प्रमाणात समुदायाचे सक्षमीकरण आणि प्रगती करत वंचितांना शाश्वतपणे पाठिंबा देण्यावर असेल.

पशुविकास दिन हा सकारात्मक बदल घडवण्यासाठी अतूट बांधिलकीचे उदाहरण देतो आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रात शाश्वत पद्धतींना चालना देतो. यावर्षी कंपनीने देशभरात आयोजित सर्वात मोठ्या एकदिवसीय पशुविकास शिबिरांसाठी वर्ल्ड रेकॉर्ड युनियनसह नवा विक्रम केला आहे.

Continue reading

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...
Skip to content