Homeचिट चॅटदेशातल्या अध्यात्मिक पर्यटनासाठी...

देशातल्या अध्यात्मिक पर्यटनासाठी ‘ईझीदर्शन’ लाँच

इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन ट्रॅव्‍हल टेक प्‍लॅटफॉर्मने त्‍यांची नवीन ऑफरिंग ईझीदर्शन लाँच केले आहे. हे समर्पित व्‍यासपीठ भारतभरात सर्वसमावेशक तीर्थक्षेत्र पॅकेजेस् प्रदान करत पर्यटकांच्‍या अध्‍यात्मिक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी बारकाईने डिझाइन करण्‍यात आले आहे.

ईझीदर्शन अनेक विशेषरित्‍या डिझाइन करण्‍यात आलेल्‍या दैवी पॅकेजेसची श्रेणी देते, ज्‍यामधून भक्‍तांना त्‍यांच्‍या आध्‍यात्मिक प्रवासावर लक्ष केंद्रित करता येऊ शकते आणि लॉजिस्टिक्‍स व नियोजनासंदर्भात कोणताही त्रास होणार नाही.

हे व्‍यासपीठ विविध पॅकेजेस् देते आणि या पॅकेजमध्‍ये निसर्गरम्‍य हिमालयातील तीर्थक्षेत्रांपासून दक्षिणेकडील शांततामय मंदिरांपर्यंत देशभरातील आदरणीय तीर्थक्षेत्रांच्या विस्तृत स्पेक्ट्रमचा समावेश आहे. तसेच ग्राहकांना ऑफर केलेल्या पॅकेजमध्ये वाहतूक, निवास, मार्गदर्शित टूर आणि विशेष पूजा यांचा समावेश आहे. सुरक्षितता व स्वच्छता उपायांना प्राधान्य देऊन प्‍लॅटफॉर्म पर्यटकांना सोयीस्कर, सुरक्षित आणि शांत अध्यात्मिक टूरचा आनंद मिळण्‍याची खात्री देईल.

इझमायट्रिपचे सीईओ व सह-संस्‍थापक निशांत पिट्टी म्‍हणाले की, भारत अध्यात्माची भूमी म्हणून ओळखला जातो, जेथे सुंदर कोरीव मंदिरे, शांत गुरुद्वारा, भव्य चर्च व भव्य मशिदी आहेत. म्हणूनच भारतीयांच्या मनात आध्यात्मिक पर्यटनाला विशेष स्थान आहे आणि लोक आता पूर्वीपेक्षा अधिक उत्साहासह धार्मिक व आध्यात्मिक स्थळांना भेट देण्यास उत्सुक आहेत. आम्हाला माहित होते की, हे प्राधान्‍य न देण्‍यात आलेले क्षेत्र असून त्‍यामध्‍ये विकासाची मोठी क्षमता आहे. यामधून आम्‍हाला ईझीदर्शन लाँच करण्‍यास प्रेरणा मिळाली. या व्‍यासपीठाच्‍या माध्‍यमातून भक्ती व सोयीसुविधा यांच्यातील तफावत दूर करण्‍याचा आणि आमच्या ग्राहकांना त्‍यांच्‍या आध्यात्मिक आकांक्षेशी जुळणारे अखंड, सोयीस्कर व सुरक्षित तीर्थयात्रा अनुभव देण्‍याचा आमचा मानस आहे.

आध्‍यात्मिक पर्यटन ही भारतीय प्रवास व पर्यटन उद्योगामधील प्रमुख बाजारपेठ आहे. या अद्वितीय विभागामध्‍ये प्रवेश करणे हे ब्रॅण्‍डचे धोरणात्‍मक पाऊल आहे, ज्‍यामागे ग्राहकांचा तीर्थक्षेत्रांना भेट देण्‍याचा अनुभव सुलभ व संपन्‍न करण्‍याचा एकमेव उद्देश आहे.

Continue reading

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत...

भारत-पाक-अफगाणिस्तानच्या डोक्यावर हजार किमीचा असामान्य पाऊसपट्टा!

भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सध्या एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली हवामानप्रणाली सक्रिय झाली आहे. तब्बल एक हजार किलोमीटर लांबीचा एक सलग पाऊसपट्टा या तीन देशांवर पसरला असून हवामानतज्ज्ञांनी याला अत्यंत असामान्य घटना म्हणून संबोधले आहे. साधारणपणे अशा हवामानप्रणाली वक्राकार...
Skip to content