Homeन्यूज अँड व्ह्यूजवन्य आशियाई हत्तींची...

वन्य आशियाई हत्तींची सर्वाधिक संख्या भारतात!

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल तसेच कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी पर्यावरणीय कल्याण आणि शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी भारताच्या आर्थिक विकासात जैवविविधता संवर्धनाला मुख्य प्रवाहात आणण्यावर भर दिला आहे. ते भुवनेश्वर येथे जागतिक हत्ती दिनानिमित्त आयोजित मेळाव्याला संबोधित करत होते. वन्य आशियाई हत्तींची सर्वाधिक संख्या असलेला भारत हा या प्रजातीच्या दीर्घकालीन संवर्धनाचा मुख्य आधार आहे, असे त्यांनी सांगितले. हत्तींच्या संवर्धनाला नवीन उंचीवर नेण्यासाठी स्थानिक समुदायांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. मानव कल्याण आणि हत्ती संवर्धन यांचा मेळ साधण्यासाठी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालय कटिबद्ध आहे, असेही यादव म्हणाले.

रेल्वेबरोबर हत्तींची होणारी धडक या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (MoEFCC), रेल्वे मंत्रालय, राज्य वन विभाग आणि भारतीय वन्यजीव संस्थेसारख्या राष्ट्रीय संस्थांनी घेतलेल्या एकत्रित प्रयत्नांवर मंत्र्यांनी प्रकाश टाकला. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, देशातील रेल्वे मार्गावर हत्तींच्या अधिवासातून जाणारे सुमारे 110 महत्वपूर्ण भाग सुनिश्चित करण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.

या महत्वपूर्ण टप्प्यांमध्ये, रेल्वेशी हत्तींची टक्कर होण्याच्या घटना कमी करण्यासाठी बहुआयामी रणनीती आखण्यात आल्या आहेत, असे यादव यांनी सांगितले. हत्तींची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी मंत्रालयाने देशातील सर्व बंदिस्त हत्तींचे गुणसूत्रीय मॅपिंग तयार करण्यासाठी हाती घेतलेल्या अभिनव उपक्रमावर यादव यांनी प्रकाश टाकला.

मंत्रालयाने प्रथमच देशभरातील हत्ती अभयारण्यांचे व्यवस्थापन परिणामकारकता आणि मूल्यांकन करणे सुरू केले आहे, असेही ते म्हणाले.

यासाठी देशातील चार हत्ती बहुल प्रदेशांतील \चार हत्ती अभयारण्ये  सुनिश्चित करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. हत्ती अभयारण्यांमधील सर्वोत्तम पद्धतींचे प्रमाणीकरण आणि प्रचार करण्याच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल ठरेल, असे ते म्हणाले. गेल्या 2 वर्षात देशातील हत्ती अभयारण्याचे जाळे 76,508 वर्ग किमी वरून 80,777 वर्ग किमी पर्यंत वाढले असून त्यात 33 हत्ती अभयारण्यांचा समावेश आहे, अशी माहिती यादव यांनी दिली.

आपल्या मुख्य भाषणानंतर यादव यांनी गज साथी तसेच मानव-हत्ती संघर्ष व्यवस्थापित करण्यात आघाडीवर असलेल्या इतर आघाडीच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

जागतिक हत्ती दिनाच्या समारंभाचा एक भाग म्हणून, मंत्र्यांनी प्रोजेक्ट एलिफंटने तयार केलेल्या भारतातील हत्ती कॉरिडॉरवरील अहवालाचे प्रकाशन केले. स्थानिक लोकांचा हत्तींबाबत नकारात्मक दृष्टीकोन टाळण्यासाठी तसेच हत्तींच्या विना अडथळा हालचाली सुनिश्चित करण्यासाठी या कॉरिडॉरचे व्यवस्थापन आणि संरक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात हा अहवाल राज्य सरकारांना मदत करेल. हत्ती संवर्धन आणि व्यवस्थापन क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल मंत्री महोदयांनी पुरस्कार विजेत्यांना गज गौरव पुरस्कार प्रदान केले. पृथ्वीवरील सर्वात आगळ्या प्रजातींपैकी एक असणाऱ्या हत्तींचे संरक्षण करण्याच्या मानवजातीच्या सामूहिक प्रतिज्ञेबाबत कटीबद्धता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 12 ऑगस्ट हा दिवस जगभरात जागतिक हत्ती दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात, हत्तींना राष्ट्रीय वारसा प्राणी मानले जाते आणि हत्ती आपल्या संस्कृतीत खोलवर वसलेले आहेत.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content