Homeमाय व्हॉईसकुत्ता गोली कुत्ती...

कुत्ता गोली कुत्ती गोलीपेक्षा असते भारी..

वास्तविक, अंमली पदार्थाच्या सेवनानंतर कोणत्याही व्यक्तीला नशा चढते आणि त्या व्यक्तीचे भान हरपते. भान हरपल्यानंतर त्या व्यक्तीला कोणतेच भान उरत नाही. पण अंमली पदार्थांमध्येही लिंगविशिष्ट विभागणी आहे आणि कुत्ता गोलीपेक्षा कुत्ती गोली किंवा कुतिया गोलीच्या सेवनाने नशा कमी प्रमाणात चढते, अशी नवी आणि नशिल्या पदार्थांतही लिंगभेद असल्याची माहिती महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी विधानसभेत दिली.

मालेगावमध्ये अंमली पदार्थांच्या सेवनाने पुढची पिढी बरबादीच्या मार्गावर आहे अशी चिंता करत त्याबद्दलचा प्रश्न आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांनी एका तारांकित प्रश्नाद्वारे विचारला होता. त्यांनी कुत्ता गोली असा उल्लेख केल्यानंतर सभागृहात आमदारांमध्ये त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली. कुत्ता गोली खाल्ल्याने सेवन केलेली व्यक्ती कुत्र्यासारखे करू लागतो, असे आमदार सुनील राणे म्हणाले. त्यावर नाना पटोले यांनी, ये कुत्ता गोली क्या है असा सवाल अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मराव बाबा अत्राम यांना केला. त्यानंतरही आमदारांमध्ये कुजबूज सुरू असल्याने आधी माणसांच्या गोळ्यांवर बोला, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.

अत्राम यांनी त्यानंतर हिंदीमध्ये उत्तर द्यायला सुरूवात केल्यावर हिंदीमध्ये का बोलताय, अशी विचारणा झाली. त्यावर जिस भाषा मे सवाल पूछा जायेगा उसीमे जबाब दूँगा, चाहे तो गोंडी में दू, माडिया में दू, तेलुगू में दू या अंग्रेजी मे भी दे सकता हूँ, असे अत्राम म्हणाले. संस्कृत मे दे सकते है क्या, असे बसल्या

कुत्ती

जागेवरून एका सदस्याने विचारताच, मुझे संस्कृत नही आती, मगर फ्रेंच भाषा में दे सकता हूँ, असे अत्राम म्हणाले. त्यावर हसतहसत हस्तक्षेप करत अध्यक्ष नार्वेकर म्हणाले की, मी फ्रेंच भाषेत उत्तर द्यायला परवानगी देणार नाही. भारतात असलेल्या अधिकृत भाषांमध्ये उत्तर देऊ शकता.

कुत्ता गोली म्हणजे अल्प्राझोलम.. ही गोळी सेवन केल्यास नशा चढते आणि अशा ११ हजार ५३५ गोळ्या अन्न आणि औषध प्रशासनाने जप्त केल्या आहेत, असेही मंत्री अत्राम यांनी सांगितले. यासंदर्भात सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून १३ जणांवर कारवाई केली आहे. त्यापैकी ८ जण जामिनावर सुटले असून पाच जण कारागृहामध्ये आहेत, असेही अत्राम यांनी सांगितले.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपप्रश्न विचारताना मंत्रिहोदयांना कुत्ता गोळीसारखी कुत्ती गोली किंवा कुतिया गोली आहे, हे माहीत आहे का, अशी विचारणा केली. तसेच कुत्ता गोली म्हणजे स्ट्रॉन्ग आणि कुत्ती गोली म्हणजे माइल्ड, असा फरकही देशमुख यांनी सभागृहाला सांगितला. त्यावर मंत्री अत्राम यांनी सांगितले की, मला कुत्ती गोळीविषयी माहिती नाही, पण मी माहिती घेऊन सभागृहाच्या पटलावर ठेवेन.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

आव्हाड, पडळकरांचे वागणे आठवीतल्या मुलांनाही लाजवणारे…

मी उद्धव ठाकरे यांना सत्ताधारी बाजूला यायचे आहे का, असे लायटर व्हेनमध्ये विचारले होते आणि तुम्ही.. तुम्ही लोकांनी त्याची हेडलाईन करून टाकली, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आपली कैफियत मांडली तर याच विषयावर उद्धव ठाकरे यांना माध्यमांनी प्रश्न...

दिनोने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया…

कामं देताना यांना दिनू मोरे दिसला नाही, पण दिनो मोरिया दिसला आणि आता त्या दिनोने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी आज विधानसभेत शिवसेना (उबाठा)वर टीका केली. कोरोना काळात कापड दुकानदार आणि हॉटेलवाल्याला...

व्हेरिफिकेशनसाठीचे अर्थपूर्ण कागद…

पडताळणी किंवा व्हेरिफिकेशनची प्रमाणित कार्यपद्धती म्हणजेच स्टँण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अस्तित्त्वात असली तरी काही विशिष्ट कागदपत्रे दिल्यानंतर ही पडताळणी कशी वेगाने होते, हे सर्वांना माहीत आहे, अशी टिप्पणी शिवसेना (उबाठा)चे आमदार सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत केली आणि संपूर्ण सभागृह...
Skip to content