Saturday, February 8, 2025
Homeकल्चर +क्रिस्टीना पिस्जकोव्हा ठरली...

क्रिस्टीना पिस्जकोव्हा ठरली ७१वी मिस वर्ल्ड!

तब्बल २८ वर्षांनंतर भारतात आयोजित करण्यात आलेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत काल झेक प्रजासत्ताकची सौंदर्यवती क्रिस्टीना पिस्जकोव्हा ७१वी मिस वर्ल्ड ठरली. गेल्या वर्षाची मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलावस्का हिने क्रिस्टीना हिला मिस वर्ल्डचा मुकूट घातला. या सौंदर्य स्पर्धेत लेबनॉनची यास्मिना झायटौन उपविजेती ठरली. सिनी शेट्टीने भारताचे प्रतिनिधित्व करताना शीर्ष आठमध्ये स्थान मिळवले.

मिस वर्ल्ड स्पर्धेचा अंतिम सोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडला. मिस वर्ल्ड स्पर्धा तब्बल २८ वर्षानंतर भारतात आयोजित करण्यात आली. मिस वर्ल्ड २०२४ स्पर्धेसाठी १२ जजचं पॅनल होतं. यामध्ये मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या सीईओ ज्युलिया मॉर्ले, मिस वर्ल्ड इंडियाचे चेयरमन जामिल सैदी, तीन माजी मिस वर्ल्ड यांच्यासह बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन, पूजा हेगडे, अमृता फडणवीस, साजिद नाडियाडवाला, माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग यांचा समावेश होता. या सर्व सदस्यांनी मिस वर्ल्ड २०२४ या स्पर्धेचं परीक्षण केलं. 

प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहर आणि २०१३मध्ये मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी मेगन यंगने यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले. नेहा कक्कर, तिचा भाऊ टोनी कक्कर आणि शान यासारख्या प्रसिद्ध गायकांनी परफॉर्म केलं. या कार्यक्रमामुळे स्पर्धेला चार चांद लागले.

Continue reading

‘छबी’तून उलगडणार अनोखी छबी!

प्रत्येक फोटोमागे एक गोष्ट असते तशी प्रत्येक फोटोग्राफरचीही एक गोष्ट असते. अशाच फोटोग्राफरची रंजक गोष्ट "छबी" या चित्रपटातून उलगडणार आहे. अद्वैत मसूरकर दिग्दर्शित, तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २५ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल...

वस‌ईच्या सूर्योदय आरबीएल स्कूलला विजेतेपद

मुंबईतल्या ए डब्ल्यू एम एच महाराष्ट्र या संस्थेने आयोजित केलेल्या स्पेशल चाईल्ड स्कूलच्या मुलांच्या क्रिकेटच्या अंतिम सामन्यात‌ वसई येथील सूर्योदय आरबीएल स्कूल मतिमंद मुलांच्या शाळेच्या संघाने विजेतेपद मिळविले. गोरेगाव येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात‌ सूर्योदय आरबीएल स्कूलने मुंबई उपनगर...

वरळीत कोटक कुटुंबाने 202 कोटींत खरेदी केले 12 फ्लॅट्स!

कोटक महिंद्रा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ उदय कोटक यांनी मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात अलीकडील सर्वात मोठी व्यक्तिगत खरेदी केली आहे. त्यांनी वरळीत तब्बल 200 कोटींहून अधिक रक्कम मोजून फ्लॅट्स खरेदी केले आहेत. शिव सागर नावाच्या तीन मजली...
Skip to content