Homeचिट चॅटकोल्हापूरचा ओंकार पाडळकर...

कोल्हापूरचा ओंकार पाडळकर ठरला ‘ज्यु. महाराष्ट्र श्री’!

कोल्हापूरच्या ओंकार पाडळकरने आपल्या पिळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करत प्रतिष्ठेच्या समाजल्या जाणाऱ्या ४४व्या ‘ज्युनियर महाराष्ट्र श्री’ किताबावर आपले नाव कोरले. रायगडच्या जीवन सपकाळला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत नाशिकची कविता शेवरे अव्वल ठरली.

पुण्यातील श्री शिवाजी मराठा हायस्कूलच्या मैदानावर पार पडलेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत १९ जिल्ह्यांतील १२४ स्पर्धकांनी आपले कौशल्य पणाला लावले. या स्पर्धेत कोल्हापूरच्या ओंकार पाडळकरने जेतेपद पटकावले असले तरी या स्पर्धेवर मुंबई उपनगरचे वर्चस्व होते. ५५ ते ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकण्याची किमया उपनगरच्याच खेळाडूंनी दाखवली. चंद्रशेखर धावडे यांच्या वतीने आयोजित स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ आमदार रवींद्र धंगेकर, प्रशांत जगताप, चंद्रशेखर धावडे, महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे डॉ. संजय मोरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते शरद चव्हाण, राजेश सावंत, श्रेयश धावडे, अनिल शिंदे, किरण भिसे, इलियास शेख, योगेश कांबळे यांच्या उपस्थितीत झाला.

ज्युनियर महाराष्ट्र श्रीचा निकाल-

५५ किलो: १. ओमकार भानसे (मुंबई उपनगर), २. हनुमान भगत (रायगड), ३. हर्षद देशमुख (रायगड), ४. शशिराज दुबे (मुंबई ), ५. सिद्धांत लाड (मुंबई उपनगर), ६. दर्शन सावंत (मुंबई )

६० किलो: १. सिद्धेश सुर्वे (मुंबई उपनगर), २. प्रणय मुंडकर (रायगड), ३. रोशन पाटील (रायगड), ४. सागर ठाकूर (पुणे), ५. मयुरेश ठक्कर (मुंबई), ६. आदित्य ठोंबरे (कोल्हापूर)

६५ किलो: १. प्रतीक साळवी (मुंबई उपनगर), २. अभय चौहान (नगर), ३. प्रतीक पाटील (पुणे), ४. दर्शन खराडे (पुणे), ५. अंगद सरोदे (जालना), ६. अथर्व करकुड (पुणे)

७० किलो: १. अतुल अधिकारी (मुंबई उपनगर), २. देवांग जाधव (मुंबई), ३. रामचंद्र सहानी (प. ठाणे), ४. चंद्रमा गौड (रायगड), ५. राहुल महाडे (पुणे), ६. संजीत कामठे (मबई)

७५ किलो: १. नवनाथ कामथे (मुंबई उपनगर), २. साहिल सावंत (मुंबई ), ३. विवेक गुप्ता (नगर), ४. ऋषिकेश बिरेदर (पुणे), ५. प्रोसेंजित दत्त (प. ठाणे), ६. जांभुळकर (पुणे)

८० किलो: १. ओंकार पाडळकर (कोल्हापूर), २. मयुर शिंदे (नाशिक), ३. ऋत्विक जाधव (पुणे), ४. उबेद समीर सय्यद (पुणे), ५. ध्रुव पवार (पुणे)

८० किलोवरील: १. जीवन सपकाळ (रायगड), २. प्रणव खातू (मुंबई ), ३. प्रणीत कदम (पुणे), ४. यश कारंडे (मुंबई ), ५. प्रणव कदम (पुणे), ६. सौरभ पवार (कोल्हापूर)

मेन्स मास्टर्स (खुला गट): १. कुमम कोयंबा (प. ठाणे), २. चिराग पाटील (पालघर), ३. नितीन ढाकळे (पुणे), ४. विश्वनाथ डोणे (पुणे), ५. महेश शिगवण (पुणे), ६. शशिकांत जगदाळे (मुंबई)

मेन्स फिजिक (खुला गट): १. ऋत्विक जाधव (पुणे), २. आदित्य ठाणे (मुंबई ), ३. प्रतीक साळवी (मुंबई उपनगर), ४. रोशन पाटील (रायगड), ५. प्रणव मुंडकर (रायगड), ६. साहिल सावंत (मुंबई)

मेन्स फिजिकल चॅलेंज (खुला गट): १. सुरेश दासरी (मुंबई उपनगर), २. योगेश मेहेर (पालघर), ३. रवींद्र कदम (मुंबई ), ४. अरबाज शेख सलीम (नाशिक), ५. जय भवर (प. ठाणे), ६. अज्जू भोईर (प. ठाणे)

महिला (खुला गट): १. कविता शेवरे (नाशिक), २. रसिका हजारे (रायगड), ३. नंदिनी कांबळे (रायगड), ४. मानवी पवार (मुंबई)

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content