यष्टिरक्षक फलंदाज किंजल कुमारीच्या तुफानी फटकेबाजीच्या बळावर साईनाथ एस. सी.ने यजमान स्पोर्टिंग युनियनचा ७७ धावांनी पराभव केला. चौथी अजित घोष ट्रॉफी महिला टी२० क्रिकेट स्पर्धेत साईनाथचा हा सलग दुसरा विजय. त्यामुळे त्यांचा “अ” गटातून उपांत्य फेरीचा प्रवेश निश्चित झाला आहे. किंजलने केवळ ५४ चेंडूंमध्ये १७ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने ११५ धावांची अपराजित खेळी केली. स्पोर्टिंग युनियनने साईनाथच्या ३ बाद २२५ ला ७ बाद १४८ धावा असे प्रतिउत्तर दिले. एका अन्य सामन्यामध्ये एमआयजी क्लबने युरोपेमचा ९ विकेटनी पराभव करताना प्रतिस्पर्ध्यांची २ बाद १५२, ही धावसंख्या केवळ १४.४ षटकात पार केली.
कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि युरोपेमचे पाठबळ लाभलेल्या या स्पर्धेमध्ये किंजलने नॅशनल विरुद्ध ५१ धावांची नाबाद खेळी करुन साईनाथला ६ विकेटने विजयी केले होते. यजमान स्पोर्टिंग युनियनची अंजली सिंग हिने सलामीला येत ७० धावा केल्या खऱ्या पण भावना सानप (२८), हिच्याशिवाय तिला अन्य कोणाची साथ लाभली नाही. एमआयजीच्या विजयामध्ये मेहेक मेस्त्री (नाबाद ६४) हिचे योगदान महत्त्वाचे ठरले.
संक्षिप्त धावफलक-
युरोपेम- २० षटकात २ बाद १५२ (रिया पवार ७९ नाबाद, आदिती कदम २४) पराभूत विरुद्ध एमआयजी सी सी १४.४ षटकात १ बाद १५३ (मेहेक मेस्त्री ६४ नाबाद, हीर कोठारी ३८ नाबाद, अनिषा राऊत २६). सर्वोत्तम खेळाडू- मेहेक मेस्त्री
साईनाथ ए सी- २० षटकात ३ बाद २२५ (किंजल कुमारी ११५ नाबाद, निधी घरत ३६ नाबाद, कियारा परेरा २३) वि. वि. स्पोर्टिंग युनियन २० षटकात ७ बाद १४८ (अंजली सिंग ७०, भावना सानप २८, आंशू पाल १३/२). सर्वोत्तम खेळाडू- किंजल कुमारी
एम आय जी सी सी- २० षटकात ५ बाद १२० (मिताली गोवेकर ३६, अनिषा राऊत ४३, सानिया हुसेन २०/२, श्रेया एस. २२/२) पराभूत वि. डॅशिंग एस सी १९.४ षटकात ७ बाद १२१ (किमया राणे ३६, सामिया हुसेन २४, उन्नती नाईक २२, अनिषा राऊत २२/२). सर्वोत्तम खेळाडू- सामिया हुसेन
नॅशनल सी सी- २० षटकात ७ बाद ११४ (तनिषा शर्मा नाबाद २२) पराभूत वि. साईनाथ एस सी १९.४ षटकात ४ बाद ११६ (सेजल विश्वकर्मा २२, किंजल कुमारी नाबाद ५१, कियारा परेरा २९, आर्या उमेश २२/२). सर्वोत्तम खेळाडू- किंजल कुमारी