Homeचिट चॅटआशियाई स्पर्धेसाठी मुंबई...

आशियाई स्पर्धेसाठी मुंबई श्रीच्या खेळाडूंना खानविलकरांचे आर्थिक पाठबळ

भारतातील सर्वात सक्रिय आणि कार्यरत जिल्हा संघटना असा लौकिक असलेल्या बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेला आणि संघटनेशी संलग्नन खेळाडूंना बलशाली बनवण्याचे ध्येय उराशी बाळगणारे अध्यक्ष अजय खानविलकर पुन्हा एकदा खेळाडूंना आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी सरसावले आहेत. शुक्रवारी ७ मार्चला होणार्‍या मुंबई श्री जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत दमदार कामगिरी करणार्‍या विविध गटातील तीन खेळाडूंना आगामी आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी पाठीवर कौतुकाची थापच नव्हे तर आर्थिक पाठबळ देण्याचे खानविलकर यांनी जाहीर केले आहे. जागतिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंना प्रचंड मेहनतीबरोबर विमानप्रवासापासून हॉटेल आणि स्पर्धा फीसारखे अनेक प्रचंड खर्चही उचलावे लागतात. त्यामुळे आगामी आशियाई स्पर्धेसाठी मुंबई श्री स्पर्धेतील तीन खेळाडूंचे आर्थिक ओझे खुद्द अध्यक्ष उचलणार आहेत.

भारतीय शरीरसौष्ठवाचा कणा असलेल्या मुंबई शरीरसौष्ठवाला सर्वदृष्टीने बलशाली बनवण्याचे ध्येय साकारण्यासाठी खानविलकर गेली अनेक वर्षे झटत आहेत. शरीरसौष्ठव हा खेळ सर्वसामान्यांचा आणि होतकरू मुलांचा आहे. शरीरसौष्ठवात मुंबईसारखी अफाट गुणवत्ता अवघ्या हिंदुस्थानात कुठेही नाही. पण जागतिक स्पर्धा म्हटली की आपले असंख्य खेळाडू प्रचंड खर्चाअभावी माघार घेतात आणि खरी गुणवत्ता मागेच राहते. या गुणवत्तेला पाठबळ देण्यासाठी, पुढे आणण्यासाठी मुंबई श्रीसारखे दुसरे कोणतेही मंच असू शकत नाही. त्यामुळे या स्पर्धेतील विविध गटात जोरदार कामगिरी करणार्‍या तीन खेळाडूंना येत्या १४ ते १८ जूनदरम्यान युएईमध्ये होत असलेल्या आगामी आशियाई स्पर्धेत आर्थिक पाठबळ देणार असल्याचे खानविलकरांनी जाहीर केले.

फक्त ते तीन गुणवत्ता असलेले खेळाडू कोण असतील, हे मुंबई श्रीदरम्यानच कळेल. त्यांची निवड संघटना करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईसह राज्य संघटनेची सूत्रे स्वीकारल्यानंतर खानविलकरांनी आघाडीच्या शेकडो खेळाडूंना शरीराप्रमाणे आर्थिकदृष्टया श्रीमंत करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. आमचे ध्येय खडतर आहे आणि ते आम्ही पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असा विश्वासही खानविलकरांनी याप्रसंगी बोलून दाखविला. या ध्येयमुळेच खेळाडूंना जास्त रकमांची रोख पुरस्कार देण्याचे आणि जागतिक पातळीवर देशाचे नाव उंचावण्यासाठी खेळाडूंना लागणारे पूर्ण सहकार्य करण्यासाठी संघटना आणि मी स्वतः कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content